Menu Close

शनिशिंगणापूर भक्तनिवास पाण्याअभावी बंद

shani-shingnapur

नगर : शनिशिंगणापूरच्या शनैश्वर देवस्थानचे भक्तनिवास पाण्याअभावी बंद झाले आहे. भक्तनिवासात उतरणाऱ्या भाविकांसाठी पुरेसे पाणी उपलब्ध होत नसल्याने मागील पाच-सहा दिवसांपासून भक्तनिवास बुकिंग बंद करण्यात आले आहे. देशभरातील भाविकांची यामुळे अडचण होत असल्याने देवस्थानने पाणी उपलब्धतेचे प्रयत्न सुरू केले आहेत. शनिशिंगणापूरला शनैश्वर दर्शनासाठी देशभरातून भाविक येतात. येथे १५ वर्षांपूर्वी भक्तनिवास बांधण्यात आले आहे. सुमारे १२५ खोल्या व सभागृह मिळून एका वेळी हजाराहून अधिक भाविकांची राहण्याची व्यवस्था येथे होते. परंतु मागील आठवड्यापासून भक्तनिवासातील भाविकांसाठी पुरेसे पाणी उपलब्ध होत नसल्याने तसेच देवस्थानच्या कुपनलिकाही दुष्काळामुळे आटल्याने भक्तनिवासात नवे बुकिंग बंद करण्यात आले आहे. नेवासे व सोनई परिसरातही दुष्काळी स्थितीमुळे टँकरने पाणीपुरवठा होत असल्याने या पर्यायाचा मार्ग अवलंबण्याचे प्रयत्न देवस्थानने सुरू केले आहेत. देशभरातील विविध राज्यांतून येणाऱ्या भाविकांनाही दुष्काळाची झळ बसू लागल्याने सुट्ट्या असल्या तरी त्यांची संख्याही कमी होऊ लागली आहे.

शनैश्वर देवस्थानमध्ये पाकशाळा, गोशाळा, पिण्याचे पाणी, भक्तनिवास येथे भाविकांसाठी पाणी, तसेच वापरण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे. ते पुरेसे नसल्याने देवस्थानच्या इतिहासात प्रथमच भक्तनिवास बंद केले गेले. पूर्वी देवस्थानला सोनई, घोडेगाव, कांगोणी, खरवंडी येथील शेतकऱ्यांच्या विहिरी व कूपनलिकांतून टँकरने पाणी येत होते. पण दुष्काळामुळे या गावांमध्येही पाणीटंचाई आहे. तशात देवस्थानच्या कुपनलिकाही आटल्या आहेत. त्यामुळेच भाविकांच्या सोयीसाठी पांढरीचा पूल येथून, तसेच अन्य शक्य तेथून पाणी उपलब्धतेचे प्रयत्न देवस्थानने सुरू केले आहेत.

संदर्भ : महाराष्ट्र टाइम्स 

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *