सांगली, १७ एप्रिल (वार्ता.) – १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी देशाची फाळणी झाली, असे नाही, तर वर्ष १८३७ ला अफगाणिस्तान, वर्ष १९०४ ला नेपाळ, वर्ष १९०६ ला भूतान, वर्ष १९०७ ला तिबेट, वर्ष १९३७ ला बर्मा (म्यानमार) आणि वर्ष १९४८ ला श्रीलंका भारतातून फुटून बाहेर पडले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केलेल्या सूचना वेळोवेळी कार्यवाहीत आणल्या असत्या, तर कदाचित भारत एकसंध राहिला असता. त्यामुळे देशाची फाळणी रोखण्याची क्षमता असलेले एकमेव व्यक्तिमत्त्व म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर होय, असे प्रतिपादन माजी ज्येष्ठ संपादक डॉ. उदय निरगुडकर यांनी केले. ते श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आयोजित ‘विवेक सभे’त ‘कालातीत स्वातंत्र्यवीर सावरकर’ यावर सिटी हायस्कूल येथे झालेल्या व्याख्यानात बोलत होते. या प्रसंगी पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्यासह धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
१. चीनच्या युद्धानंतर जनरल करिअप्पा यांनी ‘वर्ष १९६३ मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार भारताने कृतीत न आणल्याने म्हणजे सैनिकीकरणावर भर न दिल्याने आज ही स्थिती आली’, असे स्पष्ट सांगितले होते. यावरून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची दूरदृष्टी लक्षात येते.
२. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मांडलेला राष्ट्रवाद, हिंदुत्व आजच्या पिढीपर्यंत पोचवले नाही, तर समाजात नक्षलवाद फोफावेल.
३. आपली प्राथमिकता केवळ देश असली पाहिजे, असे सावरकर सांगत. मुसलमानांच्या तुष्टीकरणाचा धोका ओळखून त्यावर उपाययोजना सांगणारे ते एकमेव होते.
४. माफीवीर नव्हे, तर केवळ २ वेळा दयेचे आवेदन सादर केले.
काँग्रेसी, साम्यवादी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर ‘माफीवीर’ म्हणून टीका केली जाते; मात्र त्यांनी इंग्रजांकडे कधीच माफी मागितली नाही; तर इंग्रजांकडे तेव्हा बंदीवानानांना दिलेल्या कायद्याच्या आधारे केवळ २ वेळा दयेचे आवेदन सादर केले. हे आवेदन केवळ त्यांच्या एकट्यासाठी नव्हते, तर इतरांनाही त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. कारागृहात राहून खितपत पडण्यापेक्षा बाहेर येऊन राष्ट्रकार्य करू शकू, असा उदात्त हेतू त्यामागे होता.
व्याख्याता : डाॅ.श्री.उदयदादा निरगुडकर (जेष्ठ संपादक) यांचे
विषय : कालातीत स्वातंत्र्यवीर सावरकर
दिनांक : १६ एप्रिल २०२३
वार : रविवार
वेळ : सायंकाळी ६.३० वाजता
स्थळ : सिटी हायस्कूल गावभाग सांगली.@udaynirgudkar pic.twitter.com/XAPANuCvio— Bhide Guruji Sangli (@GurujiSangli) April 14, 2023
विशेष१. प्रकृती बरी नसूनही केवळ पू. संभाजीराव भिडेगुरुजी आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्याच्या प्रेमापोटी डॉ. उदय निरगुडकर हे उपस्थित होते, तसेच मार्गदर्शनात ओघवत्या वाणीत आतापर्यंत कुठेही वाचनात न आलेली उदाहरणे देऊन वर्ष, आकडेवारी अशी पुराव्यांसह माहिती देऊन सावरकरांवरील टीकेचे त्यांनी यथार्थ खंडण केले. २. ‘या देशात जेव्हा समान नागरी कायदा येईल’, तीच खरी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासाठी श्रद्धांजली असेल, असे श्री. निरगुडकर त्यांच्या व्याख्यानात म्हणाले. |
स्रोत: दैनिक सनातन प्रभात