Menu Close

हिंदूंच्या मंदिरांवरील आक्रमणांत दुपटीने वाढ !

पाकिस्तानातील मानवी हक्क संघटनेचा अहवाल

नवी देहली – पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांकांविरुद्ध हिंसाचार आणि भेदभाव एवढा वाढला आहे की, लोक दहशतीत आहेत, अशी माहिती पाकिस्तानच्या मानवाधिकार आयोगाने त्याच्या अहवालात दिली आहे. ‘ए ब्रीच ऑफ फेथ : फ्रीडम ऑफ रिलिजन ऑर बिलीफ २०२१-२२’ असे या अहवालाचे शीर्षक आहे. पाकमध्ये वर्ष २०२१ च्या तुलनेत वर्ष २०२२ मध्ये हिंदूंच्या मंदिरांच्या तोडफोडीच्या घटना दुप्पट झाल्याचे दिसून आले आहे.

१. या अहवालात म्हटले आहे की, अल्पसंख्यांकांविरुद्ध घडलेल्या घटनांवरून सरकारची धार्मिक स्वातंत्र्याची चर्चा पोकळ असल्याचे दिसून येते. सिंधमधील हिंदु मुलींचे सातत्याने होणारे धर्मांतर चिंताजनक आहे. अल्पसंख्यांकांच्या प्रार्थनास्थळांची विटंबना आणि तोडफोड यांवर सरकार कारवाई करत नाही. वर्ष २०१४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या जिलानी निकालानुसार, ‘स्वायत्त अल्पसंख्यांक आयोग’ स्थापण्याची आवश्यकता आहे. बलपूर्वक धर्मांतरास गुन्हा ठरवण्याच्या कायदा करण्याची शिफारस केली आहे.

२. मानवाधिकार कार्यकर्त्या फरजाना बारी यांनी सांगितले की, देशात धार्मिक भेदभाव मोठ्या प्रमाणावर आहे. विवाह, धार्मिक श्रद्धा यांसह प्रत्येक क्षेत्रात भेदभाव होत आहे. हिंदु समाजाच्या सुरक्षेसाठी कायदेशीर तरतूद करण्याची मागणी होत आहे.

३. ‘पाकिस्तान दरार इतेहाद (पीडीआय)’ या हिंदूंच्या हक्कांसाठी लढणार्‍या संघटनेच्या म्हणण्यानुसार, सिंध प्रांतात लक्ष्यित हत्या, बलात्कार, हिंदूंची भूमी बळकावणे, सामूहिक धर्मांतर, घरे आणि मंदिरे जाळणे, स्मशानभूमीवर आक्रमण करणे, या घटना सर्रास घडत आहेत. अलीकडेच डॉ. बिरबल गेनानी यांची हत्या करण्यात आली.

हिंदूंविरुद्ध गुन्हे

प्रकार

वर्ष २०२२

वर्ष २०२१

लक्ष्यित हत्या २४  १७ 
सक्तीचे धर्मांतर ३४  २८ 
हत्या ३७  २१ 
मंदिरांमध्ये तोडफोड ८९  ३६ 

स्रोत : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *