Menu Close

गुंड अतिक अहमद आणि अशरफ यांच्या समर्थनार्थ माजलगाव (जिल्हा बीड) येथे फलक झळकले !

  • अतिक आणि अशरफ यांचा ‘हुतात्मा’ असा उल्लेख !

  • पोलिसांना फलक हटवले; २ जणांना अटक, तर एका धर्मांधाचा शोध चालू !

माजलगाव (जिल्हा बीड) – उत्तरप्रदेश येथील कुख्यात गुंड अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची १५ एप्रिल या दिवशी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर येथील चौकात अतिक आणि अशरफ यांच्या समर्थनार्थ फलक लावण्यात आले होते. या फलकांवर दोघांचाही ‘हुतात्मा’ म्हणून उल्लेख करण्यात आला होता, तर फलकावर दोघांच्याही हत्येचा जाहीर निषेध करण्यात आला होता. याविषयी माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ हे फलक हटवले. येथील ‘मोहसीन भैय्या मित्र मंडळा’कडून हा फलक लावण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून मोहसीन पटेल याचा पोलीस शोध घेत आहेत.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *