Menu Close

पुण्यातील पी.एफ्.आय.शी संबंधित शाळा अनधिकृत !

शाळेवर गुन्हा नोंद करण्याचे शिक्षणाधिकार्‍यांचे आदेश

कोंढव्यामधील ‘ब्ल्यू बेल्स’ शाळा

पुणे – आतंकवादी कारवायांचे प्रशिक्षण दिल्याचा आरोप करत राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने कोंढव्यामधील ‘ब्ल्यू बेल्स’ या शाळेचे २ मजले ‘सील’ केले होते. ती शाळाच अनधिकृत असल्याची माहिती समोर आली आहे. शाळेवर गुन्हा नोंद करण्याचे आदेश शिक्षणाधिकार्‍यांनी दिले आहेत. विभागीय शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांनी केलेल्या चौकशीमध्ये या शाळेकडे बोगस मान्यता प्रमाणपत्र असल्याचे समोर आले आहे. या शाळेकडे असणार्‍या मान्यतापत्रावरील तत्कालीन शिक्षण उपसंचालक अहिरे यांची स्वाक्षरीच बनावट आहे. (राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने शाळेवर धाड टाकली नसती, तर शाळा अनधिकृत आहे, हे कधीच उघड झाले नसते. आपल्या क्षेत्रात कोणत्या शाळा अनधिकृतपणे चालवल्या जात आहेत, हे शिक्षण विभागाला समजण्याची आणि त्यांच्यावर कारवाई करण्याची काही यंत्रणा अस्तित्वात आहे कि नाही ? – संपादक  दैनिक सनातन प्रभात)

८०० शाळांची कागदपत्रे संशयास्पद !

‘ब्ल्यू बेल्स’ ही स्वयं अर्थसाहाय्य असलेली शाळा (खासगी शाळा) असून वर्ष २०१९ मध्ये ती चालू झाली होती. राज्यात सी.बी.एस्.ई.च्या १ सहस्र ३०० शाळांच्या ‘एन्.ओ.सी.’ पडताळण्यात आल्या. यात अनुमाने ८०० शाळांची कागदपत्रे संशयास्पद आढळून आली आहेत. काही शाळांच्या ‘एन्.ओ.सी.’ही बोगस आढळलेल्या आहेत. त्यानंतर पुण्यातील ३०० शाळा या महाराष्ट्र बोर्डाच्या ३०० स्वयंअर्थसाहाय्यित शाळा असून या सर्वच शाळांची पडताळणी करण्याचे आदेश शिक्षणाधिकार्‍यांनी दिले आहेत.

स्रोत : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *