पुणे – ‘एअरटेल डिश’ टीव्ही चालू होतांना ‘टीव्ही’च्या ‘स्क्रीन’वर मशिदीचे चित्र दिसत होते. तसेच ‘किजिये अल्लाह की इबादत’, असे लिखाण आणि ७८६ क्रमांक जो इस्लाममध्ये शुभ मानला जातो, तो दिसत होता. (भारतात बहुसंख्य हिंदू असतांना एक आस्थापन असे कसे करू शकते ? भारतातील आस्थापनांना हिंदूंचे मूल्य काहीच वाटत नाही का ? हे हिंदूंनी लक्षात घेऊन संघटित शक्ती दाखवून द्यावी. – संपादक दैनिक सनातन प्रभात) म्हणजेच एकप्रकारे इस्लामचा प्रसार केला जात होता . ही गोष्ट येथील धर्मप्रेमी श्री. अनिल साळुंखे यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी ‘ट्विटर’वरून ‘एअरटेल’ आणि हिंदुत्दुवनिष्ठ व्यक्ती , तसेच ‘न्यूजचॅनल’ला ‘ट्वीट’ केले. तसेच ‘ई-मेल’ही केला.
‘एअरटेल डिश’ चालू होतांना ‘टिव्ही ‘च्या ‘स्क्रीन’वर दिसणारे मशिदीचे चित्र
विपत्र (E mail) केला आहे
उत्तराची वाट पाहतोय@airtelindia @airtelnews @SudarshanNewsTV pic.twitter.com/P26m9n00A2— Anil Salunkhe (@anilsalunkhe84) March 27, 2023
विरोधानंतर पालटलेले चित्र
धन्यवाद, परत अशी चूक होऊ देऊ नका@airtelindia @airtelnews @PMOIndia @CMOMaharasht @mieknathshinde @noconversion @RajThackeray @SudarshanNewsTV @Ramesh_hjs @YuvrajSambhaji @SG_HJS@Agawane7Deepak @bhidegurujii @HJSMarathi @SureshChavhanke pic.twitter.com/HzDkE39YlF
— Anil Salunkhe (@anilsalunkhe84) April 18, 2023
त्यानंतर आता ‘एअरटेल’ने हे चित्र हटवून हिंदु धर्म आणि संस्कृती विषयक चित्र ‘स्क्रीन’वर दाखवायला प्रारंभ केला आहे. वरील प्रसंगातून हिंदू संघटित झाल्यास धर्महानी रोखता येते, हे लक्षात येते. (असे धर्मप्रेमीच हिंदु धर्माची शक्ती आहेत. – संपादक दैनिक सनातन प्रभात)
स्रोत : दैनिक सनातन प्रभात