भाग्यनगर (तेलंगाणा) येथे हिंदु संघटनांच्या विरोधानंतर अवैध मशीद हटवली ! April 22, 2023 Share On : अवैध मशीद भाग्यनगर (तेलंगाणा) – येथील अंबेरपेटच्या गोलनकाजवळी मुसी नदीच्या किनारी अवैधरित्या अस्थायी मशीद बांधण्यात आली होती. येथे लोखंडी केबिन आणून त्याला मशिदीचे रूप देण्यात आले होते. येथे नमाजपठणही चालू कण्यात आले होते. ३ दिवसांनंतर यासंदर्भात बजरंग दलाला याची माहिती मिळाल्यानंतर अन्य हिंदु संघटनांना याची माहिती दिली. त्यानंतर सर्व संघटनांनी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, विभागीय आयुक्त आदींना या संदर्भात निवेदन देऊन मशीद हटवण्याची मागणी केली. यानंतर प्रशासनाने कारवाई करत येथून मशीद हटवली. हिंदु संघटनांची प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदने ज्या जागेवर अस्थायी मशीद होती, ती जागा पाटबंधार्यासाठी वापरण्याचा न्यायालयाचा आदेश आहे. तेथे अन्य कोणतेही बांधकाम करण्यास मनाई आहे. तरीही अशा प्रकारे तेथे अवैध मशीद बांधण्याचा प्रयत्न झाला. याला बजरंग दल, हिंदु जनजागृती समिती, हिंदू संघटन एकता मंच, हिंदु वाहिनी, जय श्रीराम सेना, राष्ट्रीय शिवजी सेना आणि हिंदु जॅक या संघटनांची संघटित होऊन विरोध केल्यानेच प्रशासनाला कारवाई करावी लागली. स्रोत : दैनिक सनातन प्रभात Tags : Hindu Janajagruti SamitiProtest by Hindusधर्मांधराष्ट्रीयहिंदुत्वनिष्ठ संघटनाRelated Newsमंदिरांच्या शेतजमिनी बळकावल्या जाऊ नयेत, म्हणून ‘अँटी लँड ग्रॅबिंग ॲक्ट’ करण्यासंदर्भात कार्यवाही करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन December 20, 2024पटियाला न्यायालयाने दिले दिल्ली आर्ट गॅलरीच्या सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवण्याचे आदेश December 19, 2024महाराष्ट्र मंदिर महासंघ व हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हिंदुत्ववाद्यांचे सरकार आणि सरकारचे हिंदुत्व’ या संकल्पनेवर कार्यक्रमाचे आयोजन December 17, 2024 Leave a Reply Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
मंदिरांच्या शेतजमिनी बळकावल्या जाऊ नयेत, म्हणून ‘अँटी लँड ग्रॅबिंग ॲक्ट’ करण्यासंदर्भात कार्यवाही करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन December 20, 2024
पटियाला न्यायालयाने दिले दिल्ली आर्ट गॅलरीच्या सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवण्याचे आदेश December 19, 2024
महाराष्ट्र मंदिर महासंघ व हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हिंदुत्ववाद्यांचे सरकार आणि सरकारचे हिंदुत्व’ या संकल्पनेवर कार्यक्रमाचे आयोजन December 17, 2024