चेन्नई (तमिळनाडू) – येथे हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांच्या ‘भारतीय अर्थव्यवस्थेवरील नवे आक्रमण : हलाल जिहाद ?’ या तमिळ भाषेतील ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाला ‘हिंदू मक्कल कत्छी’ (हिंदु जनता पक्ष)चे अध्यक्ष श्री. अर्जुन संपथ, ‘नॅशनल मिडिया पीपल वेल्फेअर असोसिएशन’चे अध्यक्ष श्री. प्रकाश एम्. स्वामी आणि सरचिटणीस श्री. जयकृष्णन्, ‘विश्व हिंदु परिषदे’चे श्री. श्रीधरन् यांच्यासह अनेक हिंदुत्वनिष्ठ नेते अन् प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या कार्यक्रमाला सनातनचे संत पू. पी. प्रभाकरन् आणि हिंदु जनजागृती समितीच्या पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांची वंदनीय उपस्थिती लाभली. हा प्रकाशन सोहळा येथील पाणिगृह कल्याण मंडप येथे आयोजित करण्यात आला होता. या वेळी श्री. रमेश शिंदे यांनी ‘हलाल’ आणि ‘हलाल अर्थव्यवस्थे’मुळे होणारी भीषण हानी अन् त्यामुळे राष्ट्राला असलेला धोका यांविषयी थोडक्यात माहिती सांगितली.
क्षणचित्र
या कार्यक्रमात उपस्थित पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना श्री. अर्जुन संपथ यांनी समर्पक उत्तरे दिली.
वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे१. ‘नॅशनल मिडिया पीपल वेल्फेअर असोसिएशन’चे अध्यक्ष श्री. प्रकाश एम्. स्वामी म्हणाले, ‘‘हा ग्रंथ सिद्ध करण्यासाठी श्री. रमेश शिंदे यांनी घेतलेले कष्ट आणि त्यांनी केलेले समर्पण यांना तोड नाही. या ग्रंथातील संदेशाचा प्रसार करण्यासाठी मी सक्रीय सहभाग घेणार आहे.’’ २. ‘नॅशनल मिडिया पीपल वेल्फेअर असोसिएशन’चे सरचिटणीस श्री. जयकृष्णन् म्हणाले, ‘‘येथील लोक हलालविषयी अनभिज्ञ आहेत. त्यामुळे ग्रंथातील संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोचवणे आवश्यक आहे.’’ |
स्रोत : दैनिक सनातन प्रभात