मंदिरांच्या भूमींच्या लिलावाचा अधिकार जिल्हाधिकार्यांना नाही, तर पुजार्यांना देणार ! – शिवराज सिंह चौहान, मुख्यमंत्री April 24, 2023 Share On : मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची घोषणा मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान भोपाळ (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेश सरकार कोणत्याही मंदिराच्या व्यवहारांवर नियंत्रण आणणार नाही. त्यामुळे जेवढी भूमी मंदिरांच्या नावावर आहे, तेवढ्या भूमीचा लिलाव जिल्हाधिकारी करू शकणार नाहीत. त्या भूमीचा लिलाव केवळ पुजार्यांनाच करता येईल. याखेरीज जी खासगी मंदिरे आहेत आणि जिथे विश्वस्त मंडळ आहे तेथेही पुजार्यांना सन्मानपूर्वक मानधन देण्याचा नियम सिद्ध करून निर्देश दिले जातील, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी येथे एका सभेत दिली हमने फैसला किया है कि मंदिरों की गतिविधियों पर सरकार का कोई नियंत्रण नहीं रहेगा। मंदिर की जमीनों को नीलाम कलेक्टर नहीं बल्कि पुजारी कर सकेंगे। निजी मंदिरों के पुजारियों को भी सम्मानजनक मानदेय देने की व्यवस्था की जाएगी। pic.twitter.com/QiMMREi6MI — Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) April 22, 2023 ब्राह्मणांनी धर्माचे रक्षण केले ! शिवराज सिंह चौहान म्हणाले की, मला हे सांगतांना गर्व वाटतो की, ब्राह्मणांनी धर्म, अधात्म, ज्ञान, विज्ञान, योग, आयुर्वेद, परंपरा आणि संस्कृती यांचे रक्षण करण्याचे काम केले. त्यांनी यज्ञ, हवन, शास्त्र आदी सर्व सुरक्षित ठेवण्याचे काम केले. त्यांनी संस्कृतीचे रक्षण करण्याचे काम केले. ब्राह्मणों ने हमेशा धर्म और संस्कृति की रक्षा की है इसलिए उनके कल्याण के लिए मध्यप्रदेश में 'ब्राह्मण कल्याण बोर्ड' की स्थापना करेंगे। pic.twitter.com/AtM2z0b3pw — Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) April 22, 2023 ब्राह्मणांच्या कल्याणासाठी मंडळ स्थापन करणार ! व्यास ऋषींनी महाभारत लिहिले, संत तुलसीदास यांनी रामायण लिहिले. प्रत्येक क्षेत्रात असे ब्राह्मण विद्वान आहेत. त्यामुळे आपला धर्म आणि संस्कृती यांचे रक्षक ब्राह्मण आहेत. त्यांच्या कल्याणासाठी ‘ब्राह्मण कल्याण मंडळा’ची स्थापना केली जाईल, अशी घोषणाही शिवराज सिंह चौहान यांनी या वेळी केली. स्रोत : दैनिक सनातन प्रभात Tags : Trending Topicsमंदिरे वाचवाराष्ट्रीयRelated Newsदेशात १० मशिदींच्या ठिकाणी मंदिरे असल्याचे खटले न्यायालयात प्रलंबित ! December 14, 2024चिन्मय कृष्णदास यांच्या अन्याय्य अटकेच्या निषेधार्थ हिंदु राष्ट्र समन्वय समितीकडून पुणे येथे आंदोलन December 4, 2024हिंदु जनजागृती समितीने आयोजित अधिवेशनात मथुरा आणि काशी प्रकरणांची जलद गती न्यायालयात सुनावणी करण्याची मागणी December 4, 2024 Leave a Reply Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
चिन्मय कृष्णदास यांच्या अन्याय्य अटकेच्या निषेधार्थ हिंदु राष्ट्र समन्वय समितीकडून पुणे येथे आंदोलन December 4, 2024
हिंदु जनजागृती समितीने आयोजित अधिवेशनात मथुरा आणि काशी प्रकरणांची जलद गती न्यायालयात सुनावणी करण्याची मागणी December 4, 2024