Menu Close

एन्.सी.ई.आर्.टी.च्या पुस्तकातून वगळलेला हिंदुविरोधी आणि मोगलप्रेमी मजकूर साम्यवादी केरळ सरकार मुलांना शिकवणार !

गुजरात दंगल, मोगलांचा इतिहास, रा.स्व. संघावरील बंदी आणि म. गांधी हत्या यांविषयी शिकवणार !  

कोच्ची (केरळ) – केरळ राज्यातील ‘स्टेट कौन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग’ (एस्.सी.ई.आर्.टी.) तिच्या ११ वी आणि १२ वीच्या इतिहास आणि राज्यशास्त्र या पुस्तकांमध्ये पालट करणार आहे. यात विशेष म्हणजे एन्.सी.ई.आर्.टी.ने ज्या धड्यांना तिच्या पुस्तकातून काढून टाकले होते, तो मजकूर या पुस्तकांमध्ये घेण्यात येणार आहे. शिक्षण विभागाने केरळच्या मुख्यमंत्र्यांकडे याविषयीची प्रस्ताव पाठवला आहे. याला अनुमती मिळताच तो पुस्तकांमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे. वर्ष २००२ ची गुजरातमधील दंगल, मोगल साम्राच्याचा इतिहास, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरील बंदी आणि म. गांधी यांच्या हत्येचे प्रकरण यांविषयीचा मजकूर केरळकडून त्यांच्या पुस्तकात समाविष्ट करण्यात येणार आहे. हाच मजकूर केंद्राच्या एन्.सी.ई.आर्.टी.च्या पुस्तकातून नुकताच काढण्यात आला आहे. केंद्रातील भाजप सरकारला विरोध दर्शवण्याचा, तसेच मुसलमानांना खुश करून संघाला हीन दाखवण्याचा प्रयत्न यातून केरळ सरकारकडून करण्यात येत आहे. भाजपने केरळ सरकारच्या या निर्णयाचा विरोध केला आहे.

स्रोत : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *