केरळमधील २२ सहस्र हिंदू आणि ख्रिस्ती तरुणींना लव्ह जिहादमध्ये फसवून आतंकवादी बनवले जाण्यावर आधारित आहे कथा !
(‘ट्रेलर’ म्हणजे चित्रपटाचे विज्ञापन करणारा व्हिडिओ)
नवी देहली – आगामी हिंदी चित्रपट ‘द केरल स्टोरी’चा ‘ट्रेलर’ प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटामध्ये ‘लव्ह जिहाद’द्वारे फसवण्यात आलेल्या २२ सहस्र हिंदु आणि ख्रिस्ती तरुणींचे धर्मांतर करून त्यांना आतंकवादी कारवायांसाठी सीरिया अन् अफगाणिस्तान या इस्लामी देशांत नेण्यात आल्याचे वास्तव चित्रण करण्यात आले आहे. सुदिप्तो सेन हे या चित्रपटाचे दिग्दर्शक, तर विपुल अमृतलाल शहा हे निर्माते आहेत. ५ मे या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
'The Kerala Story' trailer out, shows how girls from God's own country have fallen victim to Islamic radicalisation and joined ISIS https://t.co/djXsOnDDGG
— OpIndia.com (@OpIndia_com) April 26, 2023
या ‘ट्रेलर’मध्ये केरळमधील हिंदु कुटुंबातील शालिनी उन्नीकृष्णन् या तरुणीला लव्ह जिहादमध्ये फसवून तिचे धर्मांतर करून तिला फातिमा बनवण्यात आल्याची आणि नंतर इस्लामिक स्टेट या आतंकवादी संघटनेत भरती करण्यात आल्याची कथा दाखवण्यात आली आहे. ही कथा सत्य घटनेवर आधारित आहे, असे सांगण्यात येत आहे.
काय आहे ‘ट्रेलर’मध्ये ?
या ट्रेलरमध्ये महाविद्यालयातील मुसलमान विद्यार्थिनीच्या बुद्धीभेदाला शालिनी उन्नीकृष्णन् ही तरुणी फसते आणि ती हिजाब घालू लागते. नंतर तिचे धर्मांतर केले जाते. तिला फातिमा बनवले जाते आणि नंतर मुसलमान तरुणाशी तिचा विवाह लावून दिला जातो. यानंतर तिला इस्लामी देशात नेऊन इस्लामिक स्टेटमध्ये भरती केले जाते. या सर्व घटनाक्रमात तिला याची कोणतीच कल्पना नसते. ही गोष्ट एकट्या शालिनीची नसून केरळ राज्यातील २२ सहस्र हिंदु आणि ख्रिस्ती तरुणींची आहे, असे यात म्हटले आहे.
(सौजन्य :Sunshine Pictures)
ट्रेलरमध्ये शालिनीला ‘इस्लामिक स्टेटमध्ये कधी भरती झालीस ?’ असा प्रश्न विचाल्यावर ती म्हणते ‘हे समजण्यासाठी ‘का आणि कसे ?’ हे समजणे अधिक आवश्यक आहे’, असे सांगते. त्यानंतर ‘धर्मांध मुसलमानांची हिंदु आणि ख्रिस्ती तरुणींना कशाप्रकारे जाळ्यात ओढायचे ?’, हे षड्यंत्र दाखवले गेले आहे. यासह केरळचे माजी मुख्यमंत्री व्ही.एस्. अच्युतानंद यांनी ते मुख्यमंत्री असतांना ‘पुढील २० वर्षांत केरळ इस्लामिक राज्य बनेल’, हे विधानही ऐकवण्यात आले आहे.
स्रोत : दैनिक सनातन प्रभात