पुंछ येथे जिहादी आतंकवाद्यांनी भारतीय सैनिकांच्या वाहनावर बाँब फेकल्याचे प्रकरण
जम्मू – जम्मू-काश्मीरच्या राजोरी-पुंछ येथे नुकत्याच सुरक्षादलावर झालेल्या भीषण आतंकवादी आक्रमणाने संपूर्ण देश हादरला आहे. या आतंकवादी आक्रमणाच्या विरोधात जनता भारत सरकारकडून निर्णायक प्रत्युत्तराची वाट पहात आहे, असे ‘पनून काश्मीर’ने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. पुंछ येथे जिहादी आतंकवाद्यांनी भारतीय सैनिकांच्या वाहनावर बाँब फेकल्याने ५ सैनिक वीरगतीला प्राप्त झाले होते. या पाश्भर्वभूमीवर ‘पनून कश्मीर’ने हे प्रसिद्धीपत्रक काढले आहे.
पनून कश्मीरने पुढे म्हटले आहे, जम्मू-काश्मीरमधील आतंकवादी कारवायांमागे पाकचा हात आहे, त्यासह अंतर्गत जिहादी शक्तींमुळेही या कारवाया चालू आहेत, हे जाहीरपणे मान्य करण्याची आवश्यकता आहे. पुंछ येथे झालेला बाँबस्फोट म्हणजे गॅस सिलिंडर फुटण्याच्या घटना, युरियासारख्या रासायनिक पदार्थांचे स्फोट किंवा शॉर्ट सर्किट असे भासवण्याचा प्रयत्न होत आहे. ‘पाकिस्तानला जवळ असलेले राजोरी-पुंछ भागातील जंगल भारताच्या नियंत्रणात आहे का ?’, तसेच ‘राजोरी-पुंछमधील आतंकवादाविषयी भारत सरकार जागरूक आहे का ?’, असे प्रश्नही ‘पनून कश्मीर’ने भारत सरकारला विचारले आहे.
जिहाद्यांचा नाश केला, तरच काश्मीरमधील स्थिती सामान्य होणार !
‘पनून कश्मीर’ने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, जिहाद्यांचा नाश केला, तरच जम्मू-काश्मीरमध्ये स्थिती सामान्य होऊ शकते. जम्मू-काश्मीर पंजाबला मागे टाकून अमली पदार्थांचे दुसरे सर्वांत मोठे केंद्र बनले आहे. अमली पदार्थ आणि जिहादी आतंकवाद या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, हे सर्वश्रुत आहे. आम्ही पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री यांनी आवाहन करतो की, त्यांनी काश्मीरमधील भीषण वास्तव ओळखावे.
स्रोत : दैनिक सनातन प्रभात