Menu Close

ब्रिटनमध्ये कारागृहात कैद्यांचे इस्लाममध्ये बलपूर्वक धर्मांतर !

लंडन – ब्रिटनच्या कारागृहांमध्ये कैद्यांना त्यांच्यासोबत रहाणार्‍या मुसलमान कैद्यांकडून इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी बळजोरी केली जात आहे. मुसलमानेतर  कैद्यांच्या पलंगावर कुराण ठेवले जाते आणि त्यांना इस्लाम स्वीकारण्याचा किंवा वेदना सहन करण्याचा पर्याय दिला जातो, असे ब्रिटन सरकारने नियुक्त केलेल्या श्रद्धाविषयक विभागाचे सल्लागार कॉलिन ब्लूम यांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे.

१. ब्लूम यांच्या अहवालानुसार, कारागृहात कोणी मुसलमानेतर कैदी आढळल्यास मुसलमानांची टोळी त्याला कोणतेही संरक्षण देत नाही. त्या कैद्याला मुसलमान टोळीच्या हिंसाचाराला आणि धमक्यांना बळी पडावे लागते.

२. लंडनमधील कारागृहांमध्ये मुसलमान पुरुष कैद्यांची संख्या जवळपास ३० टक्के आहे. (अल्पसंख्य असलेले मुसलमान गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य असतात. भारतातही हेच चित्र आहे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात) या कट्टरवादी मुसलमान कैद्यांकडून इतर कैद्यांचे मोठ्या प्रमाणात इस्लाममध्ये धर्मांतर केले जाते, असे या अहवालात म्हटले आहे.

३. हे धर्मावर आधारित कट्टरवादी टोळीशी संबंधित सूत्र असल्याने तातडीने कारवाई करावी, असे कॉलिन यांनी त्यांच्या अहवालात म्हटले आहे. कोणत्याही धर्माच्या कैद्यांच्या तुलनेत कारागृहात हिंदु कैद्यांची संख्या अल्प आहे; मात्र रोजगारक्षेत्रात ते सर्वाधिक आहेत, असेही या अहवालात म्हटले आहे. (हिंदु व्यक्ती संस्कारित असते. बहुतांश हिंदू हे जगाच्या पाठीवर कुठेही असले, तरी त्यांच्यावर प्रेम, प्रामाणिकपणा हे हिंदु धर्मातील संस्कार झाल्याचे दृष्टीस पडतात ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)

४. या अहवालात कॉलिन यांनी ब्रिटनमध्ये खलिस्तानी समर्थकांच्या वाढत्या समस्यांचा मुद्दाही सरकारसमोर आणला आहे.

स्रोत : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *