पनवेल : जेव्हा भारत स्वतंत्र झाला, तेव्हा धर्माच्या आधारावर गांधी यांनी फाळणीला मान्यता दिली. पाक आणि बांगलादेश मुसलमानांना देण्यात आले. त्या वेळी राहिलेला भूभाग हिंदूंचे हिंदु राष्ट्र असायला हवे होते; पण गांधीच्या हेकेखोरपणामुळे भारतात मुसलमानांनाही त्यांनी थांबवले. आज त्याच मुसलमानांचे काँग्रेससारखे राजकीय पक्ष लांगूलचालन करत आहेत. देशातील हिंदूंची संख्या अल्प आणि मुसलमानांची संख्या वाढत आहे. येत्या काळात हिंदु म्हणून भारतात रहायचे असेल, तर हिंदूंची लोकसंख्या वाढवायला हवी. त्यासाठी प्रखर राष्ट्रभक्त नथुराम गोडसे यांचे राष्ट्रप्रेरक विचार लोकांमध्ये पसरवले पाहिजेत, असे प्रतिपादन महाराणा प्रताप बटालियनचे अध्यक्ष श्री. अजय सिंह सेंगर यांनी केले. येथे महाराणा प्रताप बटालियनच्या वतीने प्रखर राष्ट्रभक्त नथुराम गोडसे यांची १०६ वी जयंती १९ मे या दिवशी साजरी करण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी दीपप्रज्वलन करून नथुराम गोडसे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाला हिंदु जनजागृती समितीचे श्री. नरेंद्र सुर्वे, गोरक्षक सर्वश्री नितीन पाटील, संभाजी जावीर, भूषण चव्हाण, महेश पवार, हिंदवी स्वराज्य मावळा संघटनेचे श्री. गुरुनाथ मुंबईकर आणि रिपब्लिकन पक्षाच्या कविता भालेराव उपस्थित होत्या.
हिंदु राष्ट्र जनजागरण समितीचे अध्यक्ष श्री. मोतीराम गोंधळी म्हणाले, लोकमान्य टिळकांप्रमाणे हिंदूंमध्ये जागृती होण्यासाठी गोडसे यांची जयंती साजरी करण्याचा सेंगर यांचा प्रयत्न अभिनंदनीय आहे !
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात