Menu Close

४३ ते ४७ अंश सेल्सियस तापमानामध्ये दिवसभर वाळूवर बसून सूर्यसाधना करणारे काही हठयोगी साधू !

suryasadhan_hathayogi_ujjain
उन्हात वाळूवर बसून साधना करणारे साधू

उज्जैन : सिंहस्थपर्वात विविध प्रकारचे साधू आले होते. ते लोकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले होते. त्यांपैकी काही जण दिवसभर कडक उन्हात तपश्‍चर्या करत होते. एकीकडे कडक ऊन असल्यामुळे लोक बाहेर पडत नव्हते. लोकांना लगेच उन्हाळ्याचा तीव्र त्रास होत होता. मध्यप्रदेश शासनानेही ऑरेंज अलर्ट घोषित करून दुपारी १ ते ५ या वेळेत बाहेर न पडण्याची सूचना नागरिकांना केली होती. दुसरीकडे तापमान ४३ ते ४७ अंश सेल्सियस इतके प्रचंड असतांना उजडखेडा कुंभक्षेत्रातील भूखीमाता मार्गावर साधू राधिकानंदजी महाराज अत्यंत कडक उन्हात वाळूवर शांतपणे डोळे मिटून बसून साधना करत होते.

१. उजडखेडा, बडनगर महामार्ग, पेट्रोल पंपाजवळ ४ साधू कडक उन्हात साधनेला बसले होते. या विषयी त्यांना विचारल्यावर त्यांनी सांगितले की, त्यांची ही साधना वसंत पंचमीला चालू झाली असून ती ४ मास चालणार आहे. हे साधू मूळचे उत्तर भारतातील असून तेथेच त्यांनी साधना चालू केली होती. त्यांच्या अंगावर केवळ एक लंगोट होता. सिंहस्थपर्व चालू झाल्यावर ते येथे आले होते. पर्व संपल्याने ते त्यांच्या मूळ स्थानी पुन्हा साधना चालू करणार आहेत.

२. दैनिक सनातन प्रभातच्या वार्ताहराने लांबून उन्हात बसलेल्या साधूला नमस्कार केल्यावर त्या साधूने डोळे उघडले आणि त्यांना जवळ बोलावून जवळच एका मडक्यातील पाण्यात ठेवलेली द्राक्षे प्रसाद म्हणून दिली अन् पुन्हा साधनेला बसले. या साधनेत अंग पूर्णपणे भाजून निघते; मात्र हे साधू खंड पडू न देता नियमितपणे साधना करत होते. या विषयी बातमी करण्यासंदर्भात त्यांना विचारल्यावर ते म्हणाले, आमच्या गुरूंची एकदा आज्ञा घेऊन तुम्ही बातमी आणि छायाचित्र घेऊ शकता. यातून त्यांच्यातील आज्ञाधारकपणा दिसून आला. या वेळी त्यांना सनातन संस्थेची, तसेच संस्थेच्या वतीने सिंहस्थक्षेत्री लावण्यात आलेल्या प्रदर्शनाची माहिती देण्यात आली.

३. काही साधू भीषण उन्हात आपल्या चारही बाजूंना धुनी पेटवून त्यात साधनेला बसले होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *