Menu Close

गोवा येथे होणार्‍या ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’साठी प.पू. समर्थ श्री त्र्यंबकेश्‍वर चैतन्‍यजी महाराज आणि इतर संतांचे आशीर्वाद

उज्‍जैन (मध्‍यप्रदेश) – ‘अखिल भारतीय धर्मसंघ आणि स्‍वामी करपात्री फाऊंडेशन’चे प.पू. समर्थ श्री त्र्यंबकेश्‍वर चैतन्‍यजी महाराज (करपात्री धाम, वृंदावन) यांची भेट घेण्‍यात आली. या प्रसंगी लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथील स्‍वामी श्री देवेंद्रानंद सरस्‍वती महाराजही उपस्‍थित होते. या वेळी प.पू. समर्थ श्री त्र्यंबकेश्‍वर चैतन्‍यजी महाराज यांना गोव्‍यात होणार्‍या ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’साठी आमंत्रित करण्‍यात आले. प.पू. समर्थ श्री त्र्यंबकेश्‍वर चैतन्‍यजी महाराज यांनी महोत्‍सवासाठी शुभाशीर्वाद दिले.

काशीचे प.पू. स्वामी श्री सर्वेश्‍वरानंद सरस्वतीजी महाराज यांना ‘वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’साठी आशीर्वाद देण्याची प्रार्थना करतांना प.पू. समर्थ श्री त्र्यंबकेश्‍वर चैतन्यजी महाराज आणि मागच्या बाजूला बसलेले स्वामी श्री श्रीधरनंद सरस्वती महाराज

तसेच तेथे उपस्‍थित असलेले स्‍वामी श्री श्रीधरानंद सरस्‍वती महाराज (नेमावार, मध्‍यप्रदेश) आणि प.पू. स्‍वामी श्री सर्वेश्‍वरानंद सरस्‍वतीजी महाराज यांना प.पू. समर्थ श्री त्र्यंबकेश्‍वर चैतन्‍यजी महाराज यांनी हिंदु राष्‍ट्राच्‍या स्‍थापनेसाठी आयोजित करण्‍यात येणार्‍या महोत्‍सवाविषयी सांगितले अन् त्‍यांनाही या कार्यास आशीर्वाद देण्‍यास सांगितले. सर्व संतांनी हिंदु राष्‍ट्राच्‍या स्‍थापनेसाठीच्‍या कार्यास आशीर्वाद देऊन पाठिंबा दिला. या वेळी प.पू. समर्थ श्री त्र्यंबकेश्‍वर चैतन्‍यजी महाराज यांनी ‘या महोत्‍सवाला मी येण्‍याचा प्रयत्न करीन’, असे सांगितले. संतांचे आशीर्वाद घेण्‍याच्‍या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे मध्‍यप्रदेश आणि राजस्‍थान समन्‍वयक श्री. आनंद जाखोटिया आणि श्री. शैलेंद्र सेठिया उपस्‍थित होते.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *