Menu Close

पिलीभीत (उत्तरप्रदेश) येथे रोहित उपाख्य इमरान या पोलीस कर्मचार्‍याने केला लव्ह जिहाद !

इमरान आणि त्याचा भावाकडून हिंदु युवतीवर सामूहिक बलात्कार आणि धर्मांतरासाठी दबाव !

  • आता मुसलमान पोलीसच लव्ह जिहाद करू लागले आहेत, यावरून धर्मांध मुसलमानांची मजल कुठपर्यंत गेली आहे, हे लक्षात येते ! त्यामुळे आता योगी आदित्यनाथ शासनाने लव्ह जिहाद्यांना फाशी देण्याची मागणी कुणी केल्यास आश्‍चर्य वाटू नये !
  • उत्तरप्रदेशात लव्ह जिहादविरोधी कायदा अस्तित्वात असतांना पोलीच त्याचे पालन करत नसतील, तर धर्मांध मुसलमान काय पालन करणार ? यावरून तेथे लव्ह जिहादचे प्रकार सातत्याने का वाढत आहेत ? हे लक्षात येते. ही स्थिती प्रशासनाला लज्जास्पद ! -संपादक
(प्रतिकात्मक छायाचित्र)

पिलीभीत (उत्तरप्रदेश) – येथे लव्ह जिहादचे प्रकरण समोर आले असून एका हिंदु युवतीला रोहित उपाख्य इमरान मिर्झा नावाच्या पोलीस कर्मचार्‍याने प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याची घटना घडली आहे. इमरानने त्याचा धर्म आणि ओळख लपवून हिंदु युवतीला फसवले, तसेच तिला विवाहाचे आमिष दाखवत तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. ती गर्भवती राहिल्यावर तिला बलपूर्वक गर्भपात करायला लावला. पुढे तिच्याशी मंदिरात विवाह करण्याचे नाटक केले. यानतंर मिर्झा आणि त्याचा भाऊ फुरकान यांनी पीडितेला बंदूकीचा धाक दाखवत तिच्यावर अनेक वेळा सामूहिक बलात्कार केला, तसेच इस्लाममध्ये धर्मांतर करण्यासाठी दबाव आणला. या सगळ्याला कंटाळून पीडितेने पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली आहे. त्यामुळे दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवत इमरानला निलंबित केले आहे.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *