मुंबई पोलिसांकडून संरक्षण !
सत्याला विरोध होतोच, हे प्रकर्षाने दर्शवणारी घटना ! सत्य दाखवणारे अशा धमक्यांना घाबरत नाही, हे लक्षात घ्यायला हवे ! -संपादक
मुंबई – ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाच्या चमूतील एका ‘क्रू’ सदस्याला (‘क्रू’ सदस्य म्हणजे एकत्रित काम करणार्यांपैकी एक सदस्य) अनोळखी भ्रमणभाष क्रमांकावरून धमकी देण्यात आली. दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांनी याविषयी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली आहे. ‘चित्रपटातील कथा दाखवून तुम्ही चांगले केले नाही. त्यामुळे घराबाहेर एकटे पडू नका’, अशी धमकी क्रू सदस्याला देण्यात आली. या धमकीनंतर मुंबई पोलिसांनी त्या सदस्याला संरक्षण पुरवले आहे; मात्र लेखी स्वरूपात तक्रार न मिळाल्याने पोलिसांनी अद्याप अज्ञात धमकी देणार्याविरुद्ध गुन्हा नोंद केेलेला नाही. (गुन्हा घडल्याचे दिसत असतांना पोलीस स्वतःहून गुन्हा का नोंदवून घेऊन अन्वेषण का करत नाहीत ? कुणी लिखित तक्रार करण्याची वाट का बघतात ? – संपादक)
'The Kerala Story' crew member receives threat, Mumbai Police provides security
Read @ANI Story | https://t.co/WuzYXtyC5I#TheKeralaStory #MumbaiPolice pic.twitter.com/FpuJYo63Ke
— ANI Digital (@ani_digital) May 9, 2023
स्रोत: दैनिक सनातन प्रभात