पाश्चात्त्य संस्कृतीच्या अंधानुकरणाचा भयावह दुष्परिणाम रोखण्यासाठी धर्मशिक्षणच आवश्यक !
पिंपरी : येथील हिंजवडी, वाकड, पिंपळे गुरव, काळेवाडी, भोसरी आणि पिंपरी या परिसरातील औषध दुकानांमधून गर्भनिरोधक गोळ्यांच्या विक्रीचे प्रमाण वाढले आहे. त्या घेण्यात तरुणींचा सहभाग लक्षणीय असल्याचे औषध विक्रेत्यांकडून समजते. सध्या मोठ्या औषध दुकानांतून प्रतिदिन किमान ५, तर छोट्या दुकानांमधून किमान २ अशा प्रमाणात गर्भनिरोधक गोळ्यांची विक्री होत आहे. त्या गोळ्या खरेदी करणार्यांमध्ये १७ ते ३२ या वयोगटातील अविवाहित युवती आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनी यांचे प्रमाण अधिक असल्याचेही सांगण्यात येत आहे.
आधुनिक वैद्यांच्या सल्ल्याविना ही औषधे-गोळ्या घेणे धोकादायक ठरू शकते, हे ठाऊक असतांनाही अशा प्रकारे गोळ्या घेतल्या जात आहेत. (या प्रकरणी औषध विक्रेतेही दोषी आहेत वा नाही, हे अन्न आणि औषध प्रशासन पडताळून त्यांच्यावर कारवाई करेल का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) काही ठिकाणी औषध दुकानांमधून विक्री होणार्या गोळ्या आणि औषधे यांची नोंदही केली जात नाही. किशोरवयीन मुलीसुद्धा स्वत: दुकानात जाऊन गर्भनिरोधक गोळ्या घेत असल्याचे समजते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात