पोलिसांवरही आक्रमण !
- यावरून धर्मांधांना कायद्याचे भय उरलेले नाही, हे स्पष्ट होते ! दगडफेक करून कायदा हाती घेणार्या धर्मांधांना पोलिसांनी कठोर शिक्षा करायला हवी !
- असा विरोध हिंदूंनी हिंदुविरोधी चित्रपटाला केला असता, तर एव्हाना काँग्रेस, समाजवादी, बुद्धीवादी, व्यक्तीस्वातंत्र्यवाले, नास्तिक आदींनी हिंदूंना तालिबानी ठरवून ‘व्यक्तीस्वातंत्र्यावर गदा आणली जात आहे’, ‘लोकशाही धोक्यात आहे’, अशी ओरड केली असती. आता मात्र हे सर्व जण मूळ गिळून गप्प आहेत ! – संपादक
जळगाव, १३ मे (वार्ता.) – जिल्ह्यातील यावल तालुक्यातील फैजपूर येथे श्रीराम चित्रपटगृहात १२ मे या दिवशी दुपारी १२ वाजता ‘द केरल स्टोरी’ या चित्रपटाचे प्रसारण चालू होते. काही हिंदुत्वनिष्ठांनी परिसरातील महिला आणि मुली यांना हा चित्रपट विनामूल्य दाखवण्याचे नियोजन केले होते. चित्रपटाच्या मागील बाजूस एक मशीद आहे. दुपारी २.३० वाजता नमाजपठणानंतर काही धर्मांधांनी घोषणाबाजी करत चित्रपटगृह आणि महिला प्रेक्षक यांच्यावर दगडफेक केली, तसेच चित्रपटाचे फलकही फाडले. घटनास्थळी पोलीस आल्यावर धर्मांधांनी त्यांच्यावरही आक्रमण केले. (उद्दाम धर्मांध ! – संपादक)
पोलिसांकडून धर्मांधांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यास विलंब !
या घटनेचा निषेध, तसेच दगडफेक करणार्या धर्मांधांविरोधात तात्काळ कारवाई करण्यासाठी हिंदूंनी फैजपूर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. ‘चित्रपटगृह आणि चौकातील सीसीटीव्ही यांचे फुटेज पाहून पुढील कारवाई करू’, असे आश्वासन पोलिसांनी दिले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत कोणताही गुन्हा नोंदवण्यात आला नव्हता. (एरव्ही हिंदूंवर गुन्हा नोंदवण्याची घाई असणारे पोलीस धर्मांधांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यास विलंब करतात, हे लक्षात घ्या ! – संपादक)
स्रोत: दैनिक सनातन प्रभात