Menu Close

भाग्यनगरमध्ये पकडलेल्या आतंकवाद्यांना मानवी बाँब बनून माझी हत्या करायची होती – आमदार टी. राजासिंह

  • प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांची माहिती

  • पोलिसांनी ही माहिती लपवल्याचा आरोप !

  • तेलंगाणातील हिंदुद्वेषी भारत राष्ट्र समितीच्या सरकारच्या राजवटीत हिंदूंचे नेते असुरक्षित !
  • १०० कोटी हिंदूंच्या देशात हिंदुत्वनिष्ठ नेते असुरक्षित असणे हिंदूंना लज्जास्पद ! अशा धमक्या कधी अन्य पंथीय नेत्यांना मिळत नाहीत, हे लक्षात घ्या !
  • मूठभर जिहादी आतंकावाद्यांचे उच्चाटन करून सरकार १०० कोटी हिंदूंना सुरक्षितता कधी प्रदान करणार ? -संपादक
टी. राजासिंह

भाग्यनगर – येथे पकडलेल्या आतंकवाद्यांना मानवी बाँब बनून माझी हत्या करायची होती आणि पोलिसांनी ही माहिती लपवली, असा गंभीर आरोप भाग्यनगरमधील गोशामहल विधानसभा मतदारसंघातील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार श्री. टी. राजासिंह यांनी केला. या विषयीचे पत्र श्री. सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पाठवले आहे. या पत्रात त्यांनी त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांचीही मानवी बाँबद्वारे हत्या करण्याचे षड्यंत्र रचल्याची माहिती दिली. या पत्रात त्यांनी या बातमीची एक मार्गिकाही (‘लिंक’ही) पाठवली आहे.

‘ऑप इंडिया’ या वृत्तसंकेतस्थळाने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे. या वृत्तानुसार,

१. ऑक्टोबर २०२२ मध्ये अब्दुल जाहिद, महंमद मीउद्दीम आणि हसन फारूख या ३ आतंकवाद्यांना भाग्यनगर येथील मालकपट येथून अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडे शस्त्र, तसेच ५ लाख १५ सहस्र रुपयांची रोख रक्कम सापडली होती.

२. हे सर्व जण आय.एस्.आय.च्या संपर्कात होते, तसेच ते आत्मघातकी आक्रमण करण्याचे षड्यंत्र रचत होते. अशा प्रकारे आक्रमण करून त्यांना भीती निर्माण करायची होती.

३. अब्दुल जाहिद हा वर्ष २०१७ मध्ये झालेल्या एक आतंकवादी आक्रमणाच्या कटात सहभागी होता; परंतु नंतर त्याची सुटका झाली होती.

४. टी. राजासिंह म्हणाले की, तेलंगाणाच्या गुप्तचर विभागाने मला याविषयी कुठलीही माहिती देण्यास नकार दिला आहे. मी माझ्या संरक्षणासाठी असलेल्या केवळ २ पोलिसांसमवेत सार्वजनिक सभांना जात असतो. त्यामुळे मला माझ्या सुरक्षेची काळजी वाटते. काही संघटना आणि लोक माझ्यासाठी धोका आहेत; पण त्यांच्यावरील कारवाईविषयीची कुठलीच माहिती मला पोलिसांकडून दिली जात नाही. भाग्यनगर हा आतंकवाद्यांचा नवा अड्डा बनला असून वरील तिघा आतंकवाद्यांची अटक हा त्याचाच पुरावा आहे.’

५. श्री. टी. राजासिंह यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, मला आंतरराष्ट्रीय आणि भारतीय क्रमांकांवरून धमकीचे अनेक दूरभाष येतात. वरील अटकेतील आरोपींनी वर्ष २०१६-१७ मध्ये माझ्या घराची पाहणी (रेकी) केली होती. भाग्यनगरमधील सुरक्षा व्यवस्था कठोर केली पाहिजे.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *