फोंडा – ‘सुराज्य अभियान’च्या वतीने १० रुपयांची नाणी स्वीकारण्याच्या रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या (‘आर्.बी.आय.’ च्या) आदेशाचे पालन करून नागरिकांची गैरसोय टाळावी, अशी मागणी गोवा राज्य माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे संचालक श्री. दीपक बांदेकर अन् पणजी येथील अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव गावस देसाई यांची भेट घेऊन त्यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली होती.
Join @SurajyaCampaign for awareness against rejection of #10RupeesCoin legal tender
Rejection accounts to #sedation !
10 रुपये इनकार करने पर #राजद्रोह का मामला दर्ज हो सकता है ! @goacm @MIB_India @PIB_India @PIB_Panaji@RBI @rashtrapatibhvn @PMOIndia @FinMinIndia @nsitharaman pic.twitter.com/5tGAC78Irf— Surajya Abhiyan (@SurajyaCampaign) May 4, 2023
हे निवेदन रिझर्व बँकेचे अधिकारी क्लिंट यांनाही देण्यात आले होते. यानंतर संबंधितांकडून काही दुकानांवर १० आणि २० रुपयांची नाणी स्वीकारण्याविषयी नोटीस लावण्यात आली आहे. फोंडा येथे गोवा बागायतदारात ही नोटीस लावली आहे. त्याचबरोबर निरंजन स्वीट मार्ट, वरचा बाजार, फोंडा येथेही ही नोटीस लावण्यात आली आहे.