भूमीचे नियंत्रण मंदिराकडेच देण्याचा न्यायालयाचा आदेश !
मंदिरांच्या संपत्तीवर डोळा ठेवणे, हे घोर पाप असून कर्मफलन्यायानुसार त्याचे फळ देव देतोच, हेही प्रत्येकाने लक्षात घेणे आवश्यक आहे ! श्रद्धास्थानांच्या रक्षणासाठी हिंदूंनी संघटित झाले पाहिजे ! – संपादक
चेन्नई – मंदिराच्या भूमीवर अतिक्रमण करणे, हे देवतांच्या अधिकारांचे उल्लंघन आहे, असे सांगत मद्रास उच्च न्यायालयाने कांचीपूरम्मधील सुंदरेश्वर स्वामी मंदिराची भूमी बळकावणार्यांची याचिका फेटाळून लावली. मंदिराच्या मालमत्तेवरील अतिक्रमणांची प्रकरणे समयमर्यादा ठरवून योग्य पद्धतीने हाताळली पाहिजेत, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. हे प्रकरण सुंदरेश्वर स्वामी मंदिराच्या मालकीच्या भूमीत शेती करणार्या ‘कोवूर कृषी सहकारी संस्थे’चे सदस्य असलेल्या भाडेकरूंनी प्रविष्ट केलेल्या याचिकांशी संबंधित आहे.
१. या वेळी न्यायमूर्ती एस्.एम्. सुब्रह्मण्यम् म्हणाले, ‘‘मंदिराची भूमी कह्यात घेण्याचा प्रयत्न असह्य आहे. मंदिराची हानी करणार्या मंदिराच्या मालमत्तेच्या संदर्भातील कुठल्याही वादग्रस्त व्यवहाराचे प्रकरण वेळेत हाताळले जावे.
२. उच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावत कांचीपूरम्च्या जिल्हाधिकार्यांना ४ आठवड्यांच्या आत मंदिराच्या भूमीवरील अतिक्रमण हटवण्याचा, तसेच भाडेकरूंकडून थकित भाडे वसूल करण्याचा आदेश दिला आहे.
३. मद्रास उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, ‘मंदिराची देवता’ अल्पवयीन मानली जावी. मंदिराची भूमी मुक्त करण्यात विलंब केल्यास अल्पवयीन देवतेच्या अधिकारांचे उल्लंघन होईल.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात