हिंदु जनजागृती समितीद्वारे प्रबोधन
मुंबई : भाईंदर येथील ‘शिवशक्ती फूड्स’ यांची ‘माँ काली’ नावाने छापलेली कुरमुर्याची पिशवी कचर्यात आढळून आली. पिशवीच्या चारही कोपर्यात कालीमातेची त्रिशूळाच्या रूपात चित्रे होती. एक हिंदु आणि देवीचा भक्त म्हणून हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवाजी वटकर यांनी आस्थापनाचे मालक श्री. अनिल देने यांना दूरभाष केला. श्री. वटकर त्यांना म्हणाले, “चित्रातील त्रिशूळाच्या आकारात नथ, डोळे आणि चेहरा दाखवलेली कालीमाता दाखवण्यात आली आहे. हे चित्र असलेली पिशवी शौचालय, कचरा, गटार येथे टाकल्यास देवतेचा अपमान होऊ शकतो. यामुळे पापही लागते.” त्यानंतर श्री. देने यांनी प्लास्टिकच्या पिशवीवरील देवतांची चित्रे काढून टाकण्याचे मान्य केले आणि श्री. वटकर यांचे आभारही मानले. (प्रबोधनानंतर पिशवीवरील चित्र काढून टाकण्याचे तत्परतेने मान्य करणारे श्री. अनिल देने यांचे अभिनंदन ! – संपादक)
सर्वोच्च न्यायालयाने २७ आक्टोबर २०१५ या दिवशी बाबू प्रियदर्शी विरुद्ध अमृत सिंघ या खटल्याचा निर्णय दिला. त्या वेळी न्यायालयाने म्हटले, ‘वस्तू, सेवा, विक्रीसाठी देवतांच्या नावाचा आणि चित्रांचा वापर करता येणार नाही. तसे करणार्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.’ तसेच ‘इंडियन ट्रेड मार्क अॅक्ट १९९९’ यानुसार देवतांचा वापर उत्पादनाच्या विक्रीसाठी करता येणार नाही.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात