Menu Close

हरियाणा : लव्ह जिहाद्याकडून विवाहित हिंदु महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार !

हिंदु महिलांना धर्मशिक्षण नसल्यामुळेच ते लव्ह जिहाद्यांच्या जाळ्यात अडकून स्वतःचे आयुष्य उद्ध्वस्त करून घेतात ! -संपादक

हिंदु महिला लव्ह जिहाद्यांच्या जाळ्यात

अंबाला (हरियाणा) – उत्तरप्रदेशातील एका विवाहित हिंदु महिलेला अरिफ खान याने हरियाणातील अंबाला येथे १ मास बंधक बनवले आणि तिच्यावर बलात्कार केला.  खान याने तिच्यावर बुरखा घालण्यासाठी आणि नमाजपठण करण्यासाठी दबाव आणू लागला. संबंधित महिला तिथून पळून जाण्यास यशस्वी झाल्यावर तिने उत्तरप्रदेशातील मिर्झापूर येथील पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली.

महिलेने तक्रारीत म्हटले आहे की, एप्रिल २०२३ मध्ये माझ्या भ्रमणभाषवर अज्ञाताकडून फोन आला. फोन करणार्‍याने त्याचे नाव अभय मिश्रा असे सांगितले. त्यानंतर तो वारंवार फोन करू लागला. आमच्यात मैत्री झाली. त्यानंतर त्याने मला अंबाला येथे नेऊन माझ्यावर बलात्कार केला. त्यानंतर अभय मिश्रा हा आरिफ खान असल्याचे मला समजले. माझ्यावरील बलात्काराचा अश्‍लील व्हिडिओ बनवून त्याने मला धमकावले.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *