Menu Close

आसाममध्ये चारचाकी गाडीत ४ वासनांध धर्मांधांकडून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार !

अशा वासनांधांना भर चौकात फाशीची शिक्षा देण्याची मागणी केल्यास आश्‍चर्य वाटू नये ! -संपादक 

गौहत्ती – आसाम राज्यातील कोकराझार जिल्ह्यातील डोटमा परिसरात एका १३ वर्षीय मुलीवर चालत्या चारचाकी गाडीत सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचे समोर आले आहे. रुबेल रहमान, इम्रान हुसेन, अन्वर हुसेन आणि मोमिनूर रहमान अशी बलात्कार करणार्‍यांची नावे आहेत. पोलीस गस्त घालत असतांना त्यांना या चारचाकी गाडीविषयी संशय आला. त्यांनी गाडी थांबवल्यावर हे प्रकरण समोर आले.
१. १६ या दिवशी दुपारी डोटमा परिसरातील राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांची गाडी गस्त घालत त्या वेळी गाडीतील पोलिसांची दृष्टी एका संदिग्ध चारचाकी वाहनावर पडली. पोलिसांनी ही गाडी थांबवून गाडीतील लोकांची चौकशी केली.

२. त्या वेळी गाडीत अल्पवयीन मुलगी आणि ४ युवक आढळले. त्या वेळी पोलिसांनी या सर्वांना जवळच्या पोलीस ठाण्यात नेले. मुलीची चौकशी केल्यावर तिने चारचाकी गाडीमध्ये तिच्यावर बलात्कार झाल्याचे सांगितले.

३. बलात्कारी हे १९ ते २४ वयोगटातील असून ते धुबरी येथे रहाणारे आहेत. यांतील रुबेल याची पीडितेसोबत सामाजिक माध्यमांद्वारे ओळख होऊन नंतर मैत्री झाली. रुबेल पीडित मुलीला भेटण्यासाठी त्याच्या ३ मित्रांसह कोकराझार येथील डोटमा येथे पोचला होता. ती मुलगी एकटी असल्याचे पाहून या मुलांनी तिच्यावर गाडीत बलात्कार केला.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *