-
पलायनासाठी स्थानिक काँग्रेस नगरसेवक फरीद कुरेश यांना ठरवले उत्तरदायी !
-
पलायनाचे वृत्त चुकीचे असल्याचा पोलिसांचा दावा
राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने आणि फरीद कुरेश हे काँग्रेसचे नगरसेवक असल्याने पलायनाचे वृत्त खरेच आहे, असेच हिंदूंना वाटते ! काँग्रेस म्हणजे हिंदुद्वेष ! -संपादक
जयपूर (राजस्थान) – येथील किशनपोल भागातील प्रभाग क्रमांक ६९ चे काँग्रेसचे स्थानिक नगरसेवक फरीद कुरेशी यांच्यामुळे स्थानिक हिंदूंनी ते पलायन करत असल्याची भित्तीपत्रके सर्वत्र लावली आहेत. यावरून भाजपने राज्यातील काँग्रेस सरकारवर टीका केली आहे. दुसरीकडे पोलिसांनी अशा प्रकारचे कोणतेही पलायन झालेले नाही, असे म्हटले आहे. पोलिसांनी भित्तीपत्रके लावणार्यांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या प्रभागामध्ये ओम प्रकाश पारीक रहातात. काही दिवसांपूर्वी त्यांनी त्यांचे घर नगरसेवक कुरेशी यांच्या नातेवाईकाला विकले होते. यानंतरच येथे हिंदूंच्या पलायनाची भित्तीपत्रके लावण्यात आली. ही पत्रके कुणी लावली ?, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
जयपुर में लगे हिंदुओं के पलायन के पोस्टर! कांग्रेस पार्षद का आया नाम, भड़की BJP#Jaipur #Hindus #BJP #Congress | @VishalKalraNews pic.twitter.com/jWyM284sUF
— Zee News (@ZeeNews) May 21, 2023
१. ज्या भागात ही भित्तीपत्रके लावण्यात आली, त्या भागाचे नाव ‘पुरोहित मोहल्ला’ आहे. येथे बहुसंख्य हिंदू रहातात. याच्या शेजारील भागात मुसलमान बहुसंख्य आहेत. येथील हिंदूंचा आरोप आहे की, हळूहळू पुरोहित मोहल्ल्यात मुसलमानांची संख्या वाढण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी त्यांनी कुरेेशी यांना उत्तरदायी ठरवले आहे.
२. स्थानिक हिंदु महिलांनी सांगितले की, येथे आम्हाला अश्लील शिवीगाळ केली जाते. त्यांचे म्हणणे असते की, आम्ही येथून निघून जावे. पूर्वी आमची मुले रात्रीही सहज बाहेर फिरू शकत होती; मात्र आता ती बाहेर पडू शकत नाहीत.
३. पोलिसांचे म्हणणे आहे की, या भागात पलायनाची कोणतीही घटना घडलेली नाही. समाजकंटकांकडून अफवा पसरवली जात आहे.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात