Menu Close

‘हिंदूंमध्ये उंची वाढवणारा एकही देव नाही !’ – अमेरिकी विनोदी कलाकार जरना गर्ग

भारतीय वंशाच्या अमेरिकी विनोदी कलाकार जरना गर्ग यांचे हिंदुद्रोही विधान

जागतिक स्तरावर हिंदु धर्मावर होणारे आघात रोखण्यासाठी परिणामकारक हिंदूसंघटनाविना पर्याय नाही ! -संपादक 

न्यूयॉर्क – मी आणि माझे पती बुटके आहोत. आम्ही देवाला प्रार्थना करतो की आमचा मुलगा उंच व्हावा; परंतु हिंदूंमध्ये उंची वाढणारा एकही देव नाही. हिंदूंमध्ये १९ सहस्र देवता आहेत; परंतु एकही देव उंची वाढवण्यासाठी नाही, ज्याची भारतियांना सर्वाधिक आवश्यकता आहे, असे हिंदुद्रोही विधान भारतीय वंशाच्या अमेरिकी विनोदी कलाकार जरना गर्ग यांनी येथे केले. जरना यांच्या ‘वन इन अ बिलियन’ या प्रसारित झालेल्या व्हिडिओमध्ये त्यांनी हिंदूंच्या देवतांचा वरील प्रकारे घोर अवमान केल्याचे उघड झाले आहे.

हिंदूंकडून संताप व्यक्त !

गर्ग यांच्या या हिंदुद्वेषी विधानानंतर हिंदूंकडून संताप व्यक्त करण्यात आला. ‘जरना गर्ग या काही तरी विनोदी करून दाखवण्याच्या नादात फालतू विनोद करतात. आता त्या हिंदूंच्या देवतांची टिंगळटवाळी करण्याचे कृत्य करत आहेत’, अशी प्रतिक्रिया हिंदूंंनी व्यक्त केली आहे. यासह हिंदूंनी जरना गर्ग यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *