जीवनातील समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी ११ वर्षांपूर्वी स्वीकारला होता ख्रिस्ती धर्म !
जीवनातील कठीण परिस्थिती ही ज्याच्या-त्याच्या प्रारब्धानुसार येत असते. परिस्थिती सुसह्य होण्यासाठी अथवा तिला सामोरे जाण्याची क्षमता निर्माण होण्यासाठी योग्य साधना करणे आवश्यक आहे, असे हिंदु धर्म सांगतो. हे लक्षात घेऊन सर्व हिंदूंनी साधनारत रहाणेच त्यांच्या हिताचे आहे ! – संपादक
लोहरदगा (झारखंड) – जिल्ह्यातील मुर्की तोडार पंचायत क्षेत्रात असलेल्या तोडार मैना टोली या गावातील १३ लोकांच्या मूळच्या हिंदु कुटुंबाने ख्रिस्ती धर्म त्यागून पुन्हा हिंदु धर्मात प्रवेश केला. साधारण ११ वर्षांपूर्वी या कुटुंबाने एका पादर्याच्या सांगण्यावरून ख्रिस्ती धर्मात धर्मांतर केले होते. या हिंदु कुटुंबातील अनेक सदस्य कायम आजारी असत. ‘यापासून सुटका मिळवायची असेल, तर ख्रिस्ती धर्म स्वीकारा’, असे पादरी या कुटुंबियांना सांगत होता. त्यानुसार त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला होता; परंतु त्यानंतरही कुटुंबियांच्या जीवनातील समस्या सुटल्या नाहीत. हे लक्षात आल्यानंतर ‘आपला धर्मच सर्वश्रेष्ठ आहे’, याची कुटुंबियांना जाणीव झाली आणि त्यांनी घरवापसी केली.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात