Menu Close

देश अन् धर्म वाचविण्याविषयी हिंदु बोलत असेल, तर ते ‘हेट स्पीच’ आहे का ? – अधिवक्ता सुभाष झा, सर्वोच्च न्यायालय

‘हेट स्पीच’ कि हिंदूंना लक्ष्य करण्याचे साम्यवादी षड्यंत्र ?’ या विषयावर विशेष संवाद !

अधिवक्ता सुभाष झा

आपल्या देशात हिंदूंविरोधात अनेक राजकीय नेते आणि हिंदूविरोधी लोक नियमितपणे ‘हेट स्पीच’ करत आहेत, त्याविषयी कोणत्याही न्यायालयात अर्ज दाखल केला जात नाही. ‘हेट स्पीच’ म्हणजे काय ?’ याची व्याख्या सुस्पष्ट होणे आवश्यक आहे. सध्या न्यायाधीश निर्णय देतांना कायदे बनवायला लागले आहेत. कायदे बनवणे, हे न्यायाधीशांचे काम नसून ते संसदेचे काम आहे. भारताचे तुकडे होऊ नये, याविषयी हिंदूंनी जनजागृती करणे हे ‘हेट स्पीच’ आहे का ?, जर हिंदू आपला देश आणि धर्म वाचविण्याविषयी बोलत असेल, तर ते ‘हेट स्पीच’ आहे का ? असा परखड प्रश्न सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ अधिवक्ते सुभाष झा यांनी उपस्थित केला. ते हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘हेट स्पीच’ कि हिंदूंना लक्ष्य करण्याचे साम्यवादी षडयंत्र ?’ या विषयावरील ‘विशेष संवादा’त बोलत होते.

अधिवक्ता सुभाष झा पुढे म्हणाले की, भारतात हिंदू आपल्या अस्तित्त्वाची लढाई लढत आहेत. गेल्या काही दशकांत निर्माण झालेले अफगाणिस्तान, श्रीलंका, नेपाळ, भूतान, म्यानमार, पाकिस्तान आदी देश भारतापासून तोडण्यात आले. यातील अनेक इस्लामी राष्ट्रे झाली. सध्या भारताचे इस्लामीकरण करण्याचा प्रयोग चालू आहे. या देशाचे पुन्हा अनेक तुकडे करून देशाचे विभाजन केले जाईल, या धोक्याविषयी हिंदूंना सजग केले पाहिजे. भारताला हिंदु राष्ट्र घोषित केले नाही, तर भारताचे इस्लामीकरण होण्यास वेळ लागणार नाही, असेही अधिवक्ता झा म्हणाले.

‘सुदर्शन चॅनल’चे प्रधान संपादक श्री. सुरेश चव्हाणके म्हणाले की, अमेरिकेमध्ये ‘इस्लामोफोबिया’विषयी कायदा करण्यात आला आहे. भारतात असा कायदा करता येणार नाही, म्हणून ‘हेट स्पीच’ ही पुढील आवृत्ती आणली आहे. हिंदूंच्या विविध सभांमधून हिंदूंमध्ये जागृती केली जात आहे. त्यामुळे जिहादी अस्थिर झाले आहेत. हिंदूंच्या सभांत बोलणारे वक्ते, आयोजक यांच्याविरोधात तक्रारी दाखल करून त्यांच्यामध्ये भीती निर्माण केली जात आहे. हिंदु जनजागृती समितीच्या जळगाव येथे आयोजित केलेल्या ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’त मी केलेल्या भाषणाला ‘हेट स्पीच’चा संदर्भ देऊन माझ्याविषयी तक्रार दाखल झाली. हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह, काजल हिंदुस्तानी यांना ‘हेट स्पीच’च्या नावाखाली अटक केली होती. या सर्व प्रकारांच्या विरोधात लढाई लढण्यासाठी अधिवक्त्यांचे संघटन आवश्यक आहे.

हिंदु जनजागृती समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक श्री. प्रशांत जुवेकर म्हणाले की, आम्ही वर्ष 2008 पासून दरवर्षी जळगावमध्ये हिंदु राष्ट्र-जागृती सभा घेऊन जनजागृती करत आहोत; पण 25 डिसेंबर 2022 या दिवशी सभा घेतल्यावर कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल, अशी कुठलीही घटना घडली नाही. तरीही प्रशासनावर दबाव आणून 9 मे 2023 या दिवशी हिंदूंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. वर्ष 2012 मध्ये मुंबई येथे रझा अकादमीने सभा घेऊन दंगल घडवली; मात्र वक्त्यांवर कोणताही गुन्हा दाखल झाला नाही. अशी धर्मांधांची अनेक उदाहरणे देता येतील. जळगावात काही झालेले नसतांना हिंदूंवर ‘हेट स्पीच’चे गुन्हे दाखल होतात, हे मोठे षड्यंत्र आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *