अयोध्या : उत्तर प्रदेशात बजरंग दल आपल्या कार्यकर्त्यांना हिंदूंच्या रक्षणार्थ लाठी, तलवार आणि रायफल चालवण्याचे प्रशिक्षण देत आहे. याकरता आयोध्या येथे विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. संघटनेने दिलेल्या माहिती नुसार हिंदुना देण्यात येणारे हे प्रशिक्षण, अशा लोकांपासून संरक्षण देण्यासाठी आहे जे त्यांचे भाऊ नाहीत.
पुढील महिन्यात ५ जूनला सुल्तानपुर, गोरखपुर, पीलीभीत, नोएडा आणि फतेहपुर या ठिकाणी अशा स्वरूपाचे कॅम्प आयोजित केले जातील. बजरंग दल शस्त्र प्रशिक्षण अनेक वर्षापासून देत आहे. यापूर्वीही २००२ मध्ये बजरंग दलाने अयोध्येत शस्त्र प्रशिक्षण दिले होते.
विरोधी पक्षांनी या घटनेचे वर्णन ‘निवडणुकी पूर्वी वातवरण बिघडवण्याची कृती’ असे केले आहे. बजरंग दल ही विश्व हिन्दू परिषदेची यूथ विंग आहे.
संदर्भ : पुढारी