Menu Close

बांदा (उत्तरप्रदेश) येथील अल्पवयीन हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून सामूहिक बलात्कार !

मुलीचे अपहरण करण्यात तिच्या घराजवळ रहाणार्‍या मुसलमान महिलेने केले साहाय्य !

‘द केरल स्टोरी’नुसार हिंदु मुलींना लव्ह जिहादच्या षड्यंत्रामध्ये फसवण्यासाठी मुसलमान महिलाही भूमिका बजावतात. त्याचे हे आणखी एक उदाहरण ! -संपादक 

प्रतिकात्मक चित्र

बांदा (उत्तरप्रदेश) – धर्मांध मुसलमान युवकाने एका १६ वर्षीय हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. बांदा येथून १४ मे या दिवशी तिचे अपहरण करून आधी  पन्ना जिल्ह्यात असलेल्या बरौली येथे नेले आणि तेथून १५ मे या दिवशी गुजरातमधील सूरत येथे आणण्यात आले. धर्मांधाने त्याच्या दोन मित्रांसह तिच्यावर १४ दिवस सामूहिक बलात्कार केला. ३० मे या दिवशी पीडितेने लपून तिच्या आईला भ्रमणभाषद्वारे संपर्क साधला. आईने नातेवाइकांच्या साहाय्याने बंधक बनवलेल्या स्वत:च्या मुलीला सोडवून आणले.

पीडितेने सांगितले की, धर्मांध मुसलमानाने माझे धर्मांतर केले, तसेच त्याच्याशी विवाह करण्यासाठी दबाव आणला. यास मी विरोध केल्यावर तिला विकण्यात येईल, अशी धमकी दिली. या षड्यंत्रामध्ये पीडितेच्या घराजवळ रहाणारी एक मुसलमान महिलाही सहभागी होती. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील चौकशी करण्यात येत आहे, असे पोलिसांनी सांगितले.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *