-
मध्यप्रदेशच्या जबलपूरमध्ये लव्ह जिहाद !
-
कुटुंबियांसह हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून पोलिसांत तक्रार !
मध्यप्रदेशमध्ये धर्मांतरबंदी कायदा असूनही धर्मांध मुसलमान दिवसाढवळ्या हिंदु युवतींचे धर्मांतर करत आहेत. याचा अर्थ त्यांना कायद्याचे भय राहिलेले नाही. गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी या प्रकरणी स्वत: लक्ष घालून कठोर कारवाई करावी, ही अपेक्षा ! -संपादक
जबलपूर (मध्यप्रदेश) – येथे लव्ह जिहादचे एक प्रकरण समोर आले असून अनामिका नावाच्या हिंदु युवतीने आई-वडिलांना फसवून महंमद अयाझ या मुसलमान प्रेमीसह पळून जाऊन विवाह केला. दोघांनी न्यायालयात जाऊन आधीच विवाह केला असून ७ जून या दिवशी असलेल्या पारंपरिक विवाहाची निमंत्रणपत्रिका सामाजिक माध्यमांतून पसरल्यावर हा विषय समोर आला. पत्रिकेमध्ये २२ वर्षीय अनामिकाचे नाव ‘उजमा फातिमा’ असे लिहिण्यात आले आहे. तिने धर्मांतर केले असून पीडित आई-वडील आणि स्थानिक हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.
पीडितेच्या वडिलांनी सांगितले की, महंमदने स्वत:ची मुसलमान ओळख लपवून त्यांच्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला लग्नाचे आमीष दाखवून तिचे धर्मांतर केले. त्यांनी आरोप केला की, नियमानुसार विवाह नोंदणी अधिकार्याने नोटीस पाठवायला हवी. तशी नोटीसही त्यांनी पाठवलेली नाही. त्यामुळे कुटुंबियांनी मुसलमान मुलासह संबंधित विवाह नोंदणी निबंधकावरही कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे.
(सौजन्य : Zee News)
स्रोत: दैनिक सनातन प्रभात