-
भावाची हत्या करण्याची धमकी देत पीडितेचे धर्मांतर करून केला विवाह
-
११ वर्षे केला अत्याचार
-
अनेक हिंदु तरुणींचे केले आहे धर्मांतर
- देशात सर्वत्रच अशा प्रकारच्या घटना घडत असल्याने आता केंद्र सरकारने याची गंभीर नोंद घेऊन युद्धापातळीवर पावले उचलणे आवश्यक आहे !
- पोलिसांनीच लव्ह जिहाद करणे, म्हणजे कुंपणाने शेत खाण्याचा प्रकार आहे ! स्वतःच्याच खात्यात ११ वर्षे चालणारा हा गंभीर गुन्हा कळू न शकणार्या पोलिसांना आतंकवाद्यांच्या कारवाया कधी कळतील का ? यातील उत्तरदायी पोलीस अधिकार्यांवरही कठोर कारवाई करा ! -संपादक
हापुड (उत्तरप्रदेश) – देहलीतील पोलीस शिपाई वसीम अली आणि त्याच्या कुटुंबातील पुरुषांनी देहलीतील त्यांच्या इमारतीमध्ये एका तरुणीला खाद्यपदार्थातून नशेचा पदार्थ खाऊ घालून त्या अवस्थेत तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिला तिच्या भावाची हत्या करण्याची धमकी देत तिचे धर्मांतर केले आणि तिच्याशी विवाह केला. पुढील ११ वर्षे या तरुणीला नशेच्या गोळ्या देऊन घरात कोंडून ठेवण्यात आले होते. या काळात तिच्या दिरानेही तिचे लैंगिक शोषण केले. ११ वर्षांनंतर ती त्यांच्या कह्यातून पळून जाण्यात यशस्वी झाली. तिने तिच्या आजोबांच्या घरी जाऊन सर्व अत्याचारांची माहिती दिली. यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला. तरुणीने सांगितले की, वसीम याने अनेक हिंदु तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मांतर केले आहे. त्याने पीडितेला श्रद्धा वालकर प्रमाणे हत्या करून तुकडे करण्याची धमकीही दिली होती.
Love Jihad: हेड कांस्टेबल का शिकार बनी दरोगा की बेटी, कहा: ‘पति ने एक और हिंदू लड़की को फंसा लिया है’ #uttarpradeshnews #hapur #newdelhi #lovejihad #policeconstable #delhipolice #rape #conversion https://t.co/tjB4sXyPyC
— Oneindia Hindi (@oneindiaHindi) June 1, 2023
स्रोत: दैनिक सनातन प्रभात