मंदिर सरकारीकरणाचा दुष्परिणाम !
मुंबई : येथील श्री सिद्धीविनायक मंदिराने ४४ किलो सोने केंद्रशासनाच्या सुवर्ण ठेव योजनेत जमा केले आहे. या योजनेत जमा केलेल्या सोन्यावर मंदिराला २.२५ टक्के व्याज मिळणार असल्याची माहिती मंदिराचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सांगितले. मंदिराचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव पाटील यांनी सांगितले की, या योजनेतून शासनाकडून मिळणारी व्याजाची रक्कम समाजोपयोगी कामांसाठी व्यय केली जाईल. (मंदिरांचा पैसा केवळ धार्मिक गोष्टींसाठीच खर्च केला पाहिजे, हे शासन लक्षात घेईल का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
सध्या श्री सिद्धीविनायक मंदिराकडे १७१ किलो सोने असून यापैकी १० किलो सोने स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जमा केले आहे. त्यावर मंदिराला १ टक्का व्याज मिळते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात