Menu Close

‘म्हशी कापता येतात; मग गायी का नाही ?’ – के. व्यंकटेश, पशुसंवर्धन मंत्री

कर्नाटकच्या नवनिर्वाचित काँग्रेस सरकारमधील पशुसंवर्धन मंत्री के. व्यंकटेश यांचा संतापजनक प्रश्‍न !

  • भारतातील प्रत्येक हिंदूला गायीचे महत्त्व ठाऊक आहे आणि गायीविषयीच्या भावनाही ठाऊक आहे; मात्र व्यंकटेश जाणीवपूर्वक मुसलमानांचे लांगूलचालन करण्यासाठी असे विधान करत आहेत, हे लक्षात येते !
  • कर्नाटकमध्ये काँग्रेसला निवडून देणार्‍या हिंदूंना आता तरी त्यांची चूक लक्षात येईल का ? -संपादक 
कर्नाटकच्या काँग्रेस सरकारमधील पशुसंवर्धन मंत्री के. व्यंकटेश

बेंगळुरू (कर्नाटक) – म्हशींची सर्रास कत्तल केली जाते; मग गायींची का नाही ?, असा संतापजनक प्रश्‍न कर्नाटकमधील नवनिर्वाचित काँग्रेस सरकारमधील पशुसंवर्धन मंत्री के. व्यंकटेश यांनी उपस्थित केला. कर्नाटक राज्यात गोहत्येवर बंदी आहे. या कायद्यात काँग्रेसकडून पालट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशात के. व्यंकटेश यांनी हे विधान केल्याने हिंदूंकडून संताप व्यक्त होत आहे.

के. व्यंकटेश पुढे म्हणाले की, शेतकर्‍यांपुढे वृद्ध गुरे पाळणे आणि मेलेली जनावरे वाहून नेणे, ही मोठी समस्या आहे. मला माझ्या शेतघरामध्ये (फार्म हाऊसमध्ये) मृत गाय बाहेर काढण्यात मोठ्या अडचणी आल्या.

गोहत्या कायदा रहित करण्यावर चर्चा करून योग्य निर्णय घेणार

के. व्यंकटेश म्हणाले की, गोहत्या कायदा रहित करण्याविषयी चर्चा करून योग्य निर्णय घेण्यात येईल. गाय दत्तक घेण्याच्या योजनेचे काय झाले ?, याची चौकशी करण्यात येईल. गोशाळा चालवण्यासाठी पैशांची कमतरता नाही; पण त्या नीट चालवल्या गेल्या नाहीत.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *