Menu Close

हिंदु मुलींची हत्या करणार्‍या लव्ह जिहाद्यांना फासावर लटकवा – चिपळूण येथील आंदोलनात शेकडो हिंदूंचा उत्स्फूर्त सहभाग

हिंदु राष्ट्र जागृती आंदोलनात देशभरात ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’ करण्याची मागणी !

देशभरात ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’ करण्याची मागणी

चिपळूण (महाराष्ट्र) – हिंदूबहुल देशात खुलेआम लव्ह जिहादी हिंदु युवतींच्या हत्या करत आहेत आणि हिंदु समाज केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत, ही वास्तविकता धोकादायक असून जिहाद्यांना कठोर शिक्षा करणारा कायदा शासनाने त्वरित पारित करून या राक्षसी प्रवृत्तीला धाक बसेल, अशी कार्यवाही करत साक्षीची हत्या करणार्‍या लव्ह जिहादी साहिल खानला तात्काळ फासावर लटकवावे, अशी मागणी येथील हिंदु जनजागृती समिती, हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि धर्मप्रेमी नागरिक यांच्या वतीने हिंदु राष्ट्र जागृती आंदोलनात करण्यात आली. येथील वेस मारुति मंदिराजवळील चौपाटी,  येथे ४ जून या दिवशी हे आंदोलन झाले.

धर्मशिक्षण नसल्याने हिंदु युवती लव्ह जिहादला बळी पडतात ! – शशिकांत मोदी, नगरसेवक, शिवसेना

धर्मशिक्षण मिळत नसल्यानेच हिंदु युवती मोठ्या संख्येने लव्ह जिहादला बळी पडत  आहेत. ‘कपाळावर कुंकू लावणे, अंगभर कपडे घालणे’, या संस्कृतीचे पालन करण्याचा संस्कारही पाश्चात्त्य विचारसरणी अनुकरण करत असल्याने हिंदु कुटुंबात अल्प होत आहे.

लव्ह जिहादचे संकट नष्ट करण्यासाठी हिंदूंनी एकवटणे आवश्यक !- आशिष खातू , भाजप शहराध्यक्ष

हिंदुस्थानात लव्ह जिहादमुळे हिंदूंच्या मुलींना बळी जावे लागत असेल, तर हे जिहादी संकट नष्ट करण्यासाठी देशातील हिंदूंनी सर्व भेद विसरून एकवटले पाहिजे. शासनाने कठोर कायदा करावा यासाठी आम्ही पाठपुरावा करू.


हे ही पहा आणि इतरांनाही पहायला द्या –


हिंदूंनी बघ्याची भूमिका घेणे लांच्छनास्पद ! – माजी नगरसेविका सौ. सीमा रानडे

साक्षीवर जिहादी साहिल खान आक्रमण करताना हिंदूंनी बघ्याची भूमिका घेणे, हे लांच्छनास्पद आहे. हिंदूंचा हिंदुस्थान केवळ सांगण्या पुरतेच आहे का ? प्रत्येक हिंदु युवक युवतीने स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे.

लव्ह जिहाद विरोधात कठोर कायदा आणि त्याची तत्परतेने कार्यवाही आवश्यक ! – सुरेश शिंदे, हिंदु जनजागृती समिती

मागील वर्षी देहलीत ‘श्रद्धा वालकर’, तर झारखंडमधील ‘रविका पहाडन’ यांची अनेक तुकडे करून हत्या झाल्या; पण हिंदु मुलींना ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात ओढून होत असलेल्या भीषण हत्यांची मालिका संपलेली नसल्याचे देहलीतील ‘साक्षी’ आणि झारखंडमधील ‘अनुराधा’ प्रकरणानंतर पुन्हा एकदा देशासमोर आले आहे. याचा अर्थ या जिहादी विकृतीला व्यवस्थेचे भय राहिलेले नाही. ही स्थितीत पालट होण्यासाठी लव्ह जिहाद विरोधात कठोर कायदा आणि त्याची तत्परतेने कार्यवाही आवश्यक आहे.

या वेळी रणरागिणी शाखेच्या अभियंता कु. मृण्मयी कात्रे, वि.हिं.प.चे पराग ओक आणि ह.भ.प. महेंद्र साळुंखे यांनी त्यांचे विचार व्यक्त केले. समितीचे सचिन सकपाळ यांनी सूत्रसंचालन केले.

५ जून या दिवशी प्रांताधिकारी चिपळूण यांच्याकडे मा. केंद्रीय गृहमंत्री आणि महाराष्ट्र राज्य गृहमंत्री यांना निवेदन देण्यात आले.

या आंदोलनात शिवसेना विभागप्रमुख संदेश किंजळकर, उदय ओतारी, भाजप युवा मोर्चाचे मंदार कदम, भाजप शहर चिटणीस विनायक वरवडेकर, रा. स्व. संघाचे शरद फौजदार, सुनील वाडेकर, हिंदु स्वागत यात्रेचे श्रीकांत रानडे, महाकाली देवस्थानचे मोहन तांबट, गोपाळ कृष्ण मंदिर हवेलीचे रमेश कानजी, वि.हिं.प.चे उदय सलागरे, कात्रोळी येथील श्रीकांत निवळकर, पेडांबे लक्ष्मी नारायण मंदिराचे प्रकाश राणे, सावर्डे येथील रामचंद्र पाटोळे, सदानंद काटदरे, चिपळूण येथील नेत्रमाला सलागरे, गणेश आग्रे, काशिनाथ हरेकर, संतोष जाधव उपस्थित होते.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *