Menu Close

‘लव्‍ह जिहाद’ला तोंड देण्‍यासाठी धर्मशिक्षण घेणे, तसेच स्‍वरक्षण शिकणेही आवश्‍यक – किरण दुसे, हिंदु जनजागृती समिती

उपस्‍थित धर्मप्रेमींना मार्गदर्शन करतांना श्री. किरण दुसे

निपाणी (कर्नाटक) – ‘लव्‍ह जिहाद’ आपल्‍या उंबरठ्यापर्यंत येऊन पोचला आहे. ‘लव्‍ह जिहाद’ला तोंड देण्‍यासाठी धर्मशिक्षण घेणे, तसेच स्‍वरक्षण शिकणेही आवश्‍यक आहे. हिंदु युवती आणि महिला यांनी कोणत्‍याही आमिषाला बळी न पडता हिंदु संस्‍कृतीप्रमाणे आचरण करणे आवश्‍यक आहे. धर्माचरण केल्‍यास ‘लव्‍ह जिहाद’ला हिंदु युवती बळी पडणार नाहीत, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे कोल्‍हापूर जिल्‍हा समन्‍वयक श्री. किरण दुसे यांनी केले. विश्‍व हिंदु परिषद-बजरंग दल यांच्‍या वतीने सौंदलगा येथे ३ जून या दिवशी ग्रामपंचायत सभागृह येथे ‘लव्‍ह जिहाद’आणि ‘लँड जिहाद’विषयी मार्गदर्शन करण्‍यात आले. त्‍या प्रसंगी ते बोलत होते.

याचा लाभ निपाणी, यमकर्णी, सौंदलगा परिसरातील १३० हून अधिक जिज्ञासूंनी घेतला. या वेळी बजरंग दलाचेे श्री. अजित पारळे, जिल्‍हा सहसंयोजक श्री. राजू पुरंत, राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे श्री. परिश्रम भानसे, तालुका कार्यवाह श्री. सुमेध देशपांडे आणि अन्‍य उपस्‍थित होते.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *