संतप्त हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांची पोलीस ठाण्यासमोर निदर्शने !
(‘स्टेटस’ म्हणजे इतरांना पहाता येण्यासाठी स्वतःच्या भ्रमणभाषवर ठेवलेले चित्र किंवा मजकूर)
हा हिंदूंना डिवचण्याचा आणि आक्रमकांचे उदात्तीकरण करण्याचाच प्रकार नव्हे का ? यातून त्यांचे हिंदूंविरुद्ध काही षड्यंत्र रचले जात नाही ना ?, याची पोलिसांनी चौकशी करणे आवश्यक आहे ! -संपादक
कोल्हापूर – दिनांकानुसार असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेकदिनाच्या दिवशीच सदरबझार येथील काही धर्मांधांनी टिपू सुलतान याच्या समर्थनार्थ भ्रमणभाषवर ‘स्टेटस’ ठेवल्याचे काही हिंदुत्वनिष्ठांच्या निदर्शनास आले. यानंतर संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना अटक करावी, या मागणीसाठी संतप्त हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यासमोर निदर्शने केली. अशा प्रकारे जाणीवपूर्वक तेढ निर्माण करणार्या धर्मांधांवर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शाहूपुरी पोलीस ठाण्यात देण्यात आले.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात