Menu Close

थेरगाव (जिल्हा पुणे) : एका धर्मांध भोंदूबाबाकडून एका महिलेवर बलात्कार, धर्मांधाला अटक

अल्पसंख्यांकांच्या भोंदूगिरीविषयी तृप्ती देसाई आवाज उठवतील का ?

tantrikपुणे : येथील एका धर्मांध भोंदूबाबाने एका २६ वर्षीय महिलेवर करणी झाल्याचे सांगत बलात्कार केल्याची घटना येथील थेरगाव भागात २० मे या दिवशी उघड झाली आहे. या प्रकरणी वाकड पोलिसांनी रमजान शेख याच्या विरोधात महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष, अनिष्ट अघोर प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा प्रविष्ट केला आहे. वाकड पोलिसांनी शेख याला २२ मे या दिवशी अटक केली आहे.

१. पीडित महिला मे २०१५ मध्ये रुग्णाईत होती. त्या वेळी शेख याने तिच्याशी संपर्क साधून तिच्या घरावर करणी केल्याचे सांगितले. माझ्या अंगात दैवी शक्ती आहे. मी तुमच्या घरावर केलेली करणी दूर करू शकतो; परंतु त्यासाठी तुला ७ वेळा माझ्यासमवेत शारीरिक संबंध ठेवावे लागतील. याविषयी कोणालाही माहिती दिल्यास तुझ्या घरातील एका व्यक्तीचा मृत्यू होईल, अशी धमकी दिली.

२. त्यामुळे गेले वर्षभर ही महिला त्याचा अत्याचार सहन करत राहिली. मागील काही दिवसांपूर्वी पीडित महिलेची चिंचवड येथील एक मैत्रिण दुपारी तिच्या घरी अचानक आली असता त्या वेळी तिने शेख याच्यातील दैवी शक्तीविषयी सांगितले.

३. त्यानंतर शेख याने त्या पीडित महिलेच्या मैत्रिणीकडेही शारीरिक संबंधाची मागणी केली. या घटनेने पीडितेची मैत्रीण घाबरली. एकूणच या प्रकरणी फसवणूक होत असल्याचे पाहून पीडित महिला आणि तिची मैत्रीण यांनी रमजान शेखविषयीची माहिती कुटुंबियांना दिली. त्यानंतर पीडित महिलेच्या पतीने पोलिसांकडे तक्रार केली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *