देशभरातील घटना पहाता हे लव्ह जिहादचे प्रकरण नसेल कशावरून ? -संपादक
तिरुचिरापल्ली (तमिळनाडू) – येथे दोन सख्ख्या बहिणींनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. तिरुचिरापल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ वर्षीय विद्या आणि २३ वर्षीय गायत्री यांचे मृतदेह वलनाडू गावात एका विहिरीत आढळले. पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या दोघी बहिणी दोन मुसलमान मुलांशी प्रेम करत होत्या. या प्रकरणी अन्वेषण चालू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मुस्लिम युवकों से शादी करना चाहती थीं 2 हिन्दू बहनें, माँ ने मना किया तो कुएँ में कूद कर ली आत्महत्या#TamilNadu #Sistershttps://t.co/LAM9Z8NOxJ
— ऑपइंडिया (@OpIndia_in) June 8, 2023
स्थानिक प्रसारमाध्यमांनुसार दोन्ही बहिणी कोईंबतूरजवळ असलेल्या कांगेयम् येथे कापड गिरणीत काम करत होत्या. तिथे काम करणार्या दोन मुसलमान मुलांशी त्यांची मैत्री झाली. या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघी बहिणी त्यांच्या प्रियकरांशी भ्रमणभाषवर तासन्तास बोलत असत. त्यांच्या आईने याविषयी विचारले असता त्यांनी सांगितले की, गिरणीमध्ये काम करणार्या दोघा मुसलमानांवर त्यांचे प्रेम आहे. दोघे मुसलमान असल्याचे समजल्यावर आई-वडिलांनी नापसंती व्यक्त केली होती.
या प्रकरणी अन्वेषण करणार्या पोलीस अधिकार्याने सांगितले की, दोन्ही बहिणी धार्मिक सीमा ओलांडून प्रेम आणि नातेसंबंध यांविषयी संभ्रमावस्थेत होत्या. दोघी त्यांच्या मूळ गावी मंदिराच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी घरी आल्या होत्या. ६ जून या दिवशी त्यांचे मृतदेह गावातील विहिरीत आढळून आले.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात