Menu Close

बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात हिंदूंचे धर्मांतर – राष्ट्रीय इतर मागासवर्गीय आयोग

  • राज्याच्या इतर मागासवर्गियांच्या सूचीमध्ये हिंदूंपेक्षा मुसलमान जातींची संख्या अधिक

  • इतर मागासवर्गियांसाठीचे लाभ घेत आहेत बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमान !

  • बंगालमध्ये हिंदु बहुसंख्य असतांना सूचीमध्ये मुसलमानांच्या जाती अधिक कशा ? ‘हिंदु वगळता अन्य धर्मियांमध्ये जाती नाहीत’, असे सांगणारे आता कुठे आहेत ?
  • भविष्यात बंगाल मुसलमानबहुल झाल्यास आश्‍चर्य वाटू नये, हेच यातून लक्षात येते ! बंगालमधील हिंदूंचे रक्षण करण्यासाठी प्रथम बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकार विसर्जित करणे आवश्यक आहे ! -संपादक 
राष्ट्रीय इतर मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर

नवी देहली – बंगालमध्ये इतर मागावर्गीय वर्गातील (ओबीसी) अनेक जातींमधील हिंदूंचे धर्मांतर करून त्यांना मुसलमान करण्यात आले आहे. तसेच या जातींना मिळणार्‍या सरकारी सुविधांचा लाभ बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोर मुसलमान घेत आहेत, अशी माहिती राष्ट्रीय इतर मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी दिली आहे.

१. हंसराज अहीर यांनी पत्रकारांना सांगितले की, आयोगाच्या पथकाने यावर्षी २५ फेब्रुवारीला बंगालचा दौरा केला होता. येथील चौकशीत बंगालमधील सांस्कृतिक संस्था  ‘कल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट’च्या अहवालामध्ये ‘हिंदूंनी मोठ्या प्रमाणात इस्लाम स्वीकाल्याची माहिती मिळाली’, असे म्हटले आहे. बंगालमध्ये बांगलादेशातून आलेल्या मुसलमानांना इतर मागावर्गियांच्या सूचीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. या सूचीमध्ये एकूणच जे इतर मागासवर्गीय नाहीत, त्यांना समाविष्ट करण्यात आले आहे. आयोगाला अनेक तक्रारी मिळाल्या आहेत आणि चौकशीत समोर आले आहे की, या सूचीमधील लोक बांगलादेशातून आले आहेत. तसेच म्यानमारमधून आलेल्या रोहिंग्या मुसलमानांनाही यात समाविष्ट करण्यात आले आहे.

२. अहीर पुढे म्हणाले की, इतर मागसवर्गीय सूचीमध्ये हिंदूंपेक्षा मुसलमानांच्या जातींची नावे अधिक आहेत. बंगाल हिंदूबहुल असतांना ही स्थिती आहे. राज्याच्या या सूचीमध्ये १७९ जातींची नावे असून त्यात ११८ मुसलमान, तर ६१ हिंदु जाती आहेत. बंगालमधील सरकारने या सूचीशी स्पष्टपणे छेडछाड केली आहे. सूचीतील ‘अ’ श्रेणीमध्ये ९० टक्के मुसलमान आहेत. तसेच ‘ब’ श्रेणीमध्येही अर्ध्याहून अधिक मुसलमान आहेत. याविषयी विचारणा केल्यावर सरकारचे म्हणणे आहे की, यांतील अनेक जण पूर्वी हिंदू होते.

३. अहीर यांनी सांगितले की, बंगाल सरकारने ‘कुरेशी’ या मुसलमान जातीला इतर मागासवर्गियांच्या केंद्रीय सूचीमध्ये समाविष्ट करण्यासाठी राष्ट्रीय मागसवर्गीय आयोगाला प्रस्ताव पाठवला आहे; मात्र बंगाल सरकार स्वतःच या जातीला वेगळे समजत नाही. विशेष म्हणजे राज्याच्या इतर मागसवर्गीय जातींच्या सूचीमध्ये कुरेशी मुसलमानांचा समावेश नाही.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *