हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी ट्वीट करून विषयाला वाचा फोडली !
संयुक्त राष्ट्रे ‘शांतता, परस्पर आदर आणि समानता’ या तत्त्वांवर कार्य करत असल्याचे एकीकडे म्हणते, तर दुसरीकडे हिंदूंना अपमानित करते. यातून संयुक्त राष्ट्रांचा हिंदुद्वेष लक्षात येतो. परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी यावरून संयुक्त राष्ट्रांना जाब विचारला पाहिजे ! -संपादक
मुंबई – संयुक्त राष्ट्रांची संघटना असलेल्या महिलांवरील भेदभावविरोधी समितीने तिच्या संकेतस्थळावर प्रातिनिधिक छायाचित्र म्हणून ३ हिंदु महिलांचे छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. (या माध्यमातून हिंदु महिलांवर भेदभाव होत असल्याचे संयुक्त राष्ट्रांना सुचवायचे आहे.) ‘हा स्वत:मध्येच एक भेदभाव आहे’, अशी टीका हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी ट्वीट करून केली.
‘हे थांबले पाहिजे’, असेही त्यांनी म्हटले असून केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाने यावर कारवाई करण्याचे आवाहनही त्यांनी ट्वीटद्वारे केले आहे.
Committee of United Nations on Elimination of Discrimination of Against Women
has a photo of Hindu Women only –
A Discrimination in itself !@UN @UNTreatyBodies pl stop this!@MinistryWCD pls take actionhttps://t.co/CngrKij9N0…@amitsurg @HinduJagrutiOrg@noconversion pic.twitter.com/y91lyTchp5— Ichalkaranjikar V.S. (@ssvirendra) June 9, 2023
स्रोत: दैनिक सनातन प्रभात