Menu Close

देहलीतील रात्रीसाठीच्या आश्रयगृहांमधील हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न

  • उच्चशिक्षित महंमद कलीम याला अटक

  • भाजपकडून केजरीवाल सरकारवर टीका

मुसलमान कितीही शिकले, तरी ते धर्मांध, आतंकवादी होतात आणि हिंदूंवर अत्याचार करतात, हे आतापर्यंत अनेक घटनांतून उघड झाले आहे. त्यामुळे ‘एका हातात कुराण आणि दुसर्‍या हातात लॅपटॉप’ अशा कितीही घोषणा शासनकर्त्यांनी केल्या, तरी वस्तूस्थितीत काहीच पालट होणार नाही, हेही तितकेच खरे ! -संपादक 

आरोपी महंमद कलीम

नवी देहली – हिंदूंचे बलपूर्वक आणि आमीष दाखवून धर्मांतराचा प्रयत्न करणार्‍या महंमद कलीम या २८ वर्षीय तरुणाला देहली पोलिसांनी अटक केली आहे. महंमद कलीम हा उच्चशिक्षित आहे. देहलीतील तुर्कमान गेट भागातील बेघरांसाठी रात्रीपुरते असलेल्या  एका आश्रयगृहाचा चालक संदीप सागर याला बलपूर्वक धर्मांतरित करण्याचा कलीम प्रयत्न करत होता. त्याने संदीप याला पैशाचे, तसेच सरकारी नोकरी देण्याचेही आमीष दाखवले  होते. संदीपने याविषयी पोलिसांत तक्रार केल्यानंतर कलीम याला अटक करण्यात आली.

१. संदीप याने सांगितले की, महंमद कलीम केवळ हिंदु धर्म सोडण्यास सांगत नव्हता, तर बुद्धीभेद करण्याचाही प्रयत्न करत होता. ‘हिंदु धर्मामध्ये काहीच नाही. त्यात कोणतीच चांगली गोष्ट नाही’, असे सांगत तो यू ट्यूबवरील इस्लामविषयी व्हिडिओ दाखवत होता. यात आतंकवाद्यांचा आदर्श असणार्‍या झाकीर नाईक याचेही व्हिडिओ होते.

२. देहलीचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी याविषयी म्हटले की, देहलीतील आश्रयगृहांमध्ये धर्मांतर करण्याची टोळी कार्यरत आहे का ? तेथे येणार्‍या हिंदूंना मुसलमान बनवले जात आहे का ? राज्यातील केजरीवाल सरकारचा हा नवा खेळ आहे आणि तो उघड झाला आहे, अशी टीका त्यांनी केली.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *