Menu Close

इरम सैफी उपाख्य ‘नेहा’ हिने विधवा हिंदु महिलेशी मैत्री करून तिच्या मुसलमान मित्रांना हिंदु महिलेवर करायला लावला सामूहिक बलात्कार !

  • बरेली (उत्तरप्रदेश) येथील ‘द केरल स्टोरी’ !

  • अश्‍लील व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देत धर्मांतरासाठी दबाव !

  • ‘द केरल स्टोरी’ चित्रपट ही काल्पनिक कथा असल्याचे म्हणणार्‍यांना याविषयी काय म्हणायचे आहे ? हिंदूंनो, लव्ह जिहाद ही वस्तूस्थिती असून तो तुमच्या शहरातही घडत आहे, हे जाणा ! त्याविरोधात आता संघटितपणे आवाज उठवण्याची वेळ आहे, हे लक्षात घेऊन सरकारला ‘लव्ह जिहाद’ आणि ‘धर्मांतर’ यांविरोधात कठोर कायदा करण्यास भाग पाडा ! -संपादक 

बरेली (उत्तरप्रदेश) – येथे धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर अत्याचार केल्याच्या दोन घटना समोर आल्या आहेत. पहिल्या घटनेत इरम सैफी नावाच्या एका मुसलमान महिलेने स्वत:चे ‘नेहा’ असे नाव सांगत एका विधवा हिंदु महिलेशी मैत्री केली. त्यानंतर तिने तिच्या मुसलमान मित्रांना बोलावले. त्यांनी विधवा महिलेवर सामूहिक बलात्कार केला. इरमचा भाऊ बल्लू याने विधवा महिलेच्या १२ वर्षीय मुलीवरही अनेक वेळा अत्याचार केले. त्यानंतर इरमने विधवा महिलेचे अश्‍लील व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देत महिला अन् तिच्या मुलीवर इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव आणला. या सगळ्याला कंटाळून विधवेने पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. पोलीस आरोपी इरम, बल्लू आणि वासनांध मुसलमान यांचा शोध घेत आहेत.

बरेली येथेच घडलेल्या अन्य एका घटनेमध्ये अरमान या धर्मांध मुसलमान तरुणाने स्वत: आकाश असल्याचे भासवले. हातावर दोरा बांधून हिंदु असल्याचे दाखवत तो येथील डॉ. राम मनोहर लोहिया राजकीय महाविद्यालयातील हिंदु विद्यार्थिनींची छेड काढत असे. हिंदुत्वनिष्ठ संघटनांना हे समजल्यावर त्यांनी या विरोधात आवाज उठवला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून अरमानला अटक केली आहे.

इरम सैफी ही कट्टर हिंदू असल्याचे भासवत होती !

इरम सैफी उपाख्य ‘नेहा’ ही हिंदु पेहराव करत असे. ती तिच्या इन्स्टाग्राम खात्यावर ‘हिंदु राष्ट्रा’चे समर्थन करणार्‍या पोस्ट करत असे. तिचे वडीलही हिंदु पेहराव करूनच वावरत असत.

हिंदूंनो, धर्मांध मुसलमानांच्या या नव्या क्लृप्त्या जाणा ! -संपादक 

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *