यवतमाळ येथे पोलीस प्रशासनाला निवेदन
यवतमाळ : नववर्षोत्सवाच्या नावाखाली ३१ डिसेंबर रोजी राज्यातील किल्ल्यांवर, तीर्थक्षेत्री, प्रेक्षणीय स्थळी आणि सार्वजनिक स्थळी होणारे गैरप्रकार थांबविण्यासाठी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाला निवेदन देण्यात आले. या वेळी पोलीस निरीक्षक प्रजापती यांनी हे निवेदन स्वीकारले. या वेळी प्रजापती म्हणाले, ३१ डिसेंबरला पोलीस पहार्याचे प्रमाण वाढवण्यात येईल, तसेच कोणाची तक्रार आल्यास त्याची तात्काळ नोंद घेण्यात येईल.
निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री प्रा. अनंत अट्रावलकर, पिल्लेवार, अमित जैस्वाल, दत्तात्रय फोकमारे आणि प्रशांत सोळंके उपस्थित होते. त्याचप्रमाणे हिंदू जनजागृती समितीच्या वतीने उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांना सुद्धा निवेदन देण्यात आले.