Menu Close

बहराईच (उत्तरप्रदेश) येथे धर्मांतर केलेल्या गरीब हिंदूंची हिंदु धर्मात घरवापसी !

हिंदूंचे धर्मांतर करणार्‍यांवर कठोर कारवाई केली पाहिजे ! -संपादक 

बहराईच (उत्तरप्रदेश) – नेपाळच्या सीमेला लागून असलेल्या उत्तरप्रदेशातील बहराईचमध्ये ख्रिस्ती मिशनर्‍यांनी धर्मांतर केलेल्या १२ हून अधिक गरीब लोक हिंदु धर्मात परतले आहेत. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी धार्मिक विधी करून त्यांचे शद्धीकरण केले. या हिंदूंना आमीष दाखवून ख्रिस्ती पंथामध्ये धर्मांतरित करण्यात आले होते.

स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, नेपाळ सीमेवर ख्रिस्ती मिशनरी सक्रीय आहेत. गरीब हिंदु गावकर्‍यांना आमीष दाखवून त्यांचे धर्मांतर करण्याचे काम ते करतात. सीमावर्ती गावांमध्ये प्रत्येक रविवारी आणि मंगळवारी प्रार्थनासभा आयोजित केल्या जातात. गरीब हिंदूंना चर्चमध्ये बोलावले जाते. तेथे लोकांना ख्रिस्ती पंथामध्ये सहभागी होण्याचे लाभ सांगून त्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जातो. त्यांना वेगवेगळ्या प्रकारची आमिषे दाखवली जातात. लोभापोटी काही हिंदू धर्माचा त्याग करतात.

धर्मांतराकडे पोलिसांकडून दुर्लक्ष ! – बजरंग दल

बजरंग दलाचे नेते दीपांशू श्रीवास्तव यांनी सांगितले की, आजूबाजूच्या सर्व गावांतील चर्चमध्ये धर्मांतराचे प्रकार चालू आहेत; मात्र पोलीस आणि प्रशासन त्याकडे लक्ष देत नाही. ख्रिस्त्यांच्या धर्मांतराच्या विरोधात हिंदु संघटना रस्त्यावर उतरून ‘घरवापसी’ मोहीम राबवत आहे.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *