पुणे – लव्ह जिहादच्या विरोधातील लढाई शेवटच्या श्वासापर्यंत चालू ठेवणार आणि आम्हीच जिंकणार, असा विश्वास मुंबई तरुण भारतच्या उपसंपादिका श्रीमती योगिता साळवी यांनी व्यक्त केला. भारत विकास परिषद, शिवाजीनगर शाखा, पुणेच्या वतीने वीर बाजी पासलकर स्मारक येथे विवेकानंद व्याख्यानमालेच्या अंतर्गत ‘लव्ह जिहादमुक्त माझे शहर’ या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी साळवी यांनी उपस्थितांना ‘लव्ह जिहाद’विषयी मार्गदर्शन केले.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात