आसाममध्ये भाजपची महिला नेता लव्ह जिहादची बळी !
- केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपच्या एका महिला नेत्याची अशी स्थिती असेल, तर सर्वसाधारण हिंदु युवती आणि महिला यांच्या सुरक्षिततेचा विचारच न केलेला बरा !
- लव्ह जिहादचे हे भयावह रूप नष्ट करण्यासाठी आता तरी सरकारने राष्ट्रव्यापी कठोर लव्ह जिहादविरोधी कायदा करावा, अशी हिंदूंची अपेक्षा ! -संपादक
गौहत्ती (आसाम) – राज्यातील गोलपारा जिल्ह्यात असलेल्या भाजपच्या महिला नेत्या जोनाली नाथ यांची त्यांचा मुसलमान प्रियकर आणि काँग्रेसचा स्थानिक नेता हसनुर इस्लाम याने हत्या केली. इस्लाम याने हत्या केल्यानंतर मृतदेह जवळच्या राष्ट्रीय महामार्गावर फेकून दिला. ही घटना ११ जूनच्या सायंकाळी घडली असून इस्लामला १२ जूनच्या सकाळी अटक करण्यात आली. त्याने गुन्हा मान्य केला आहे.
असम में BJP की महिला नेता को मारकर सड़क पर फेंका, कॉन्ग्रेस के हसनुर इस्लाम ने कबूली हत्या: चेहरे पर किए थे ताबड़तोड़ वार#Assam #Murderhttps://t.co/DF1WZHvbrd
— ऑपइंडिया (@OpIndia_in) June 14, 2023
१. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार हसनुर इस्लाम हा गोलपाराच्या मटिया क्षेत्रातील काँग्रेसचा नेता असून याआधी तो ‘ऑल असम मायनॉरिटी स्टूडेंट्स यूनियन’चा सदस्य होता.
२. पोलिसांनी सांगितले की, जोनाली नाथ आणि इस्लाम यांच्यात गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मध्यंतरी इस्लामने दुसर्या महिलेशी विवाह केल्याने जोनाली इस्लामवर रागावल्या होत्या.
३. ११ जूनच्या सायंकाळी जोनाली या इस्लामच्या गाडीत बसल्यावर दोघांमध्ये वाद झाला. तेव्हा इस्लामने जोनाली यांच्या चेहर्यावर त्या बेशुद्ध पडेपर्यंत मारले.
४. डॉक्टरांनी सांगितले की, जोनाली यांना कोणत्यातरी धारदार शस्त्राने मारण्यात आले. जोनाली याही विवाहित असून त्यांना एक मुलगी आहे.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात