Menu Close

‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ निमित्त (सच्चिदानंद परब्रह्म) डॉ. जयंत आठवले यांचा संदेश

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी होणार्‍या संघर्षासाठी भगवंतांच्या उपासनेतून सिद्ध झालेले आत्मबल वाढवा !

‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या उद्देशाने एकत्रित आलेल्या हिंदु राष्ट्रविरांना माझा नमस्कार ! हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा काळ आता समीप येत चालला आहे. रामराज्याच्या स्थापनेसाठी मर्यादापुरुषोत्तम प्रभु श्रीरामालाही हातात धनुष्य घेऊन युद्ध करावे लागले. त्यानंतरच रामराज्य साकारता आले. त्यामुळे हिंदु राष्ट्र सहजसाध्य आहे, या भ्रमात कोणी राहू नये. धर्मसंस्थापनेच्या कार्याला सूक्ष्मातील दैवी शक्ती साहाय्य करत असतात, तद्वतच सूक्ष्मातील अनिष्ट शक्ती विरोधही करत असतात. स्थुलातून हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या मागणीला होणारा विरोध, हे याचे दृश्य प्रमाण आहे. भविष्यात या हिंदु राष्ट्र विरोधकांशी संघर्ष हा होणारच आहे. संघर्षाविना देशाला स्वातंत्र्यही मिळाले नाही, तर हिंदु राष्ट्र कसे मिळेल ? यासाठी आजपासून सर्व प्रकारची सिद्धता केली पाहिजे. संघर्षासाठी भगवंतांच्या उपासनेतून सिद्ध झालेले आत्मबल आवश्यक असते. आत्मबलासाठी प्रत्येकाने साधना, म्हणजे ईश्वरीय उपासना करायला हवी. कालमहिम्यानुसार वर्ष २०२५ नंतर हिंदु राष्ट्र येणारच आहे; पण या काळात ईश्वरीय उपासना आणि हिंदु राष्ट्राच्या प्राप्तीसाठी केलेले निष्काम कर्म यांमुळे आपली सर्वांची आध्यात्मिक उन्नती होईल.

आपणा सर्व हिंदु राष्ट्रविरांना हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यासाठी भक्ती करण्याची बुद्धी आणि देवतांची शक्ती मिळावी, यासाठी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !’
– (सच्चिदानंद परब्रह्म) डॉ. जयंत आठवले, प्रेरणास्रोत, हिंदु जनजागृति समिती

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *